मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास

मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास



 पुणे: पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या सहा किलोमीटर भुयारी मार्गाचे काम कसबा पेठेपर्यंत पूर्ण झाले आहे. हा भुयारी मार्ग एकूण १२ किलोमीटर लांबीचा असून तो मुठा नदीच्या खालून तसेच पुणे शहराच्या दात लोकवस्तीमधून जात आहे. त्यापैकी ७ किलोमीटर मार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. याच मार्गावरचा दुसरा बोगदाही या ठिकाणापर्यंत लवकरच पोहचेल. 


Photos of Pune Metro subway work, how a handful of Metro tunnels were built under the river


हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

मुठा नदीच्या खालून जाणाऱ्या या बोगद्याची सुमारे ३३ मीटर खोली असून मुठा नदी पात्राच्या तळापासून तो १० मीटर खोलीवरून जात आहे. या बोगद्याचे काम बुधवार पेठेपर्यंत आल्याने मेट्रोच्या कामाचा एक महत्पूर्ण आणि मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी ३ टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येत असून त्यांनी आत्तापर्यंत ७ किमीचा (१२ किमी पैकी) भुयारी मार्ग तयार केला आहे. दोन टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्गाचे काम सुरू झाले असून एक टनेल बोरिंग मशीन स्वारगेट येथून मंडईच्या दिशेने काम करत आहे

Photos of Pune Metro subway work, how a handful of Metro tunnels were built under the river

हे पण वाचा, खडकवासला धरणातून मुठा पात्रता पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कृषी महाविद्यालयापासून मेट्रोच्या भुयारी मार्गाची सुरवात झाली होती सुरुवात झाली होती. हा भूमिगत मार्ग तयार करणारे टनेल बोरिंग मशीन बोगदा तयार करत करत आता बुधवार पेठेत पोहोचले आहे. मेट्रोच्या तांत्रिक भाषेत यास ‘ब्रेक थ्रू’ म्हटले जाते. 


पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामाचे फोटो, मेट्रोचा मुठा नदीखालूनच बोगदा कसा बनवला


हे पण वाचा, इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

दाट लोकवस्तीच्या भागातून जाणारा हा मार्ग शिवाजीनगर बस स्थानक, शिवाजीनगर न्यायालय, बुधवार पेठ (कसबा पेठ), महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.