दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

Bhide-bridge-under-water-due-to-torrential-rains-every-year-under-jalparni-this-year


 पुणे: खडकवासला धरण पाणलोट परिसरात तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरु आहे. कालपासून खडकवासला, मुळशी, टेमघर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला गेला. तर खडकवासला धरण 100 टक्के भरले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून धरणातुन प्रारंभी पाच हजार क्यूसेक इतक्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. परिणामी नदीच्या पाण्यासह वाहून आलेली जलपर्णी भिडे पुलामध्ये अडकली आहे. त्यामुळे भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात अली आहे. 


हे पण वाचा, खडकवासला धरणातून मुठा पात्रता पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


Bhide-bridge-under-water-due-to-torrential-rains-every-year-under-jalparni-this-year



नदीच्या पाण्यासह वाहून आलेली जलपर्णी भिडे पुलामध्ये अडकल्याने डेक्कन येथील भिडे पूल येथे जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला असल्याचे दिसून आले आहे. अडकलेली जलपर्णी हटविण्याचे काम पुणे महापालिकेकडून सुरू आहे.


दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली


हे पण वाचा, पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच


पुणे महानगर पालिकेकडून पावसाळ्या अगोदर आवश्यक त्या खबरदाऱ्या घेतल्या जातात. मात्र महापालिकेकडून यामध्ये दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे. दरवर्षी मुसळधार पावसाने भिडे पूल पाण्याखाली जातो, मात्र यावर्षी भिडे पूल जलपर्णीखाली गेला असल्याचं चित्र होतं.

 

Bhide-bridge-under-water-due-to-torrential-rains-every-year-under-jalparni-this-year


हे पण वाचा,

इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रमुख शहरामध्ये सरकारी व खाजगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार – अजित पवार
न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.