भाजपच्या वतीने किरकटवाडी येथे विकास आराखड्यावर चर्चासत्रा संपन्न

भाजपच्या वतीने किरकटवाडी येथे विकास आराखड्यावर चर्चासत्रा संपन्न


बातमी लावण्यासाठी संपर्क 94220 51341
किरकटवाडी: पुणे महानगर पालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या ग्रामपंचायतीचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्याठिकाणी महापालिकेकडून कारभार पाहिला जात आहे. भाजपा आपल्या दारी ऊपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने सामावेश झालेल्या गावांच्या विकास आराखडा ( २०२१ - २०४१ ) या विषयावर माहिती आणि चर्चासत्राचे आयोजन आज डॅा. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, किरकटवाडी येथे करण्यात आले होते. आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थांसमावेत बैठक आयोजित करुन गावातील अडीअडचणी समजून घेतल्या. तसेच शेतकरी आणि नागरिकांनी आराखड्याविषयी आपले प्रश्न, अडचणी या चर्चासत्रात मांडल्या.

हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'

विकास आराखडा होत असताना नागरिकांनी सामूहिक हिताच्या सूचना व हरकतींवर भर दिला पाहिजे - आराखडा अभ्यासक इंजिनिअर चेतन पेठे 

किरकटवाडी, नांदोशी गावातील जवळपास १०० शेतकरी आणि नागरिक ऊपस्थित असलेल्या या चर्चासत्रास आराखडा अभ्यासक इंजिनिअर चेतन पेठे सर यांनी मार्गदर्शन केले. विकास आराखड्याचा योग्य अभ्यास करून नवीन हद्दीतील नागरिकांनी या भागाचा नव्याने विकास होत असताना आपल्या सामुहिक हिताच्या सुचना तसेच आपल्या तक्रारी या विषयी हरकतींवर भर दिला पाहिजे तरच एक विकासाचे एक सर्वसमावेशक योग्य मॅाडेल ऊभे राहू शकेल असे मत चेतन पेठे सर यांनी मांडले. 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

शेतकरी, नागरिक संयोजक पालक नगरसेवक आणि पेठे सर यांच्यात झालेल्या चर्चासत्रात अनेकांचे प्रश्न, त्यांच्या शंकाचे निरसन होण्यास नक्कीच मदत होईल - भाजप सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट


पुणे महानगर पालिकेवर नव्याने समाविष्ट झालेल्या या २३ गावांचा अतिरिक्त भार पडलेला आहे.या गावातील ग्रामपंचायतीचा अधिकार संपुष्टात आल्याने येथील प्रशासकीय काम महानगर पालिकेकडून केले जात आहे. पुणे महानगर पालिका आणि PMRDA वादामध्ये ग्रामस्थ आणि नागणिकांमध्ये गोधळल्याचे वातावरण निर्माण झाले होते. या चर्चा सत्रामुळे ते निवळण्यास मदत झाली.  किरकटवाडी, नांदोशी गावातील मुख्यत्वे करुन स्वच्छता, रस्त्यावरील अतिक्रमणे, पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त कोठा, आरक्षणे वगैरे संदर्भातील अडीअडचणी, तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या.

हे पण वाचा, महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे


https://www.sinhagadtimes.com/2021/08/Morya-Multispeciality-Hospital-under-Mahatma-Phule-Jan-Arogya-Yojana-and-Pradhan-Mantri-Jan-Arogya-Yojana.html



 या चर्चासत्रास भाजप सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट, पालक नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका निताताई दांगट, खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे, अनंतदादा दांगट, किशोर पोकळे, किरकटवाडी गावाचे सरपंच गोकुळ करंजावणे, नांदोशी गावाचे सरपंच भाऊसाहेब किवळे, सहकार आघाडी ऊपाध्यक्ष निळकंठ शेळके, किरण हगवणे, अनिल मते, शेखर हगवणे, सचिन दगडे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सभासद, नागरिक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.