धायरी येथे भारतीय जवानांच्या शौर्यास समर्पित 'शौर्य शिल्पा'चे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अनावरण

MP 'Supriya Sule' unveils 'Shaurya Shilpa' dedicated to the bravery of Indian soldiers at Dhayari

बातमी लावण्यासाठी संपर्क 94220 51341

 धायरी: आपण आपापल्या घरांत शांत व सुरक्षित आयुष्य जगू शकतो कारण आपल्या शहरात पोलीस व सीमेवर जवान डोळ्यात तेल घालून आपले व देशाचे रक्षण करीत असतात. कडाक्याच्या उन्हात किंवा रक्त गोठेल अश्या थंडीत सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून देशाची सेवा करीत असतात. त्यांचा त्याग मनात ठेवून त्यांच्या उपकारांची जाण ठेवून आधार सोशल ट्रस्टचे संस्थापक संतोष चाकणकर यांनी धायरी येथे  भारतीय जवानांच्या शौर्यास समर्पित 'शौर्य शिल्प' उभारले त्याचे अनावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडले.  

हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'

राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा व आधार सोशल ट्रस्टचे संस्थापक संतोष चाकणकर यांच्या वतीने उभारलेल्या भारतीय जवानांच्या शौर्यास समर्पित 'शौर्य शिल्पा'चे अनावरण करण्यात आले. या अतिशय सुंदर शिल्पाच्या माध्यमातून जवानांचे शौर्य व त्यागास यांना सलाम केला आहे. या शिल्पामुळे तरुणांना लष्करात जाण्याची प्रेरणा मिळेल - खासदार सुप्रिया सुळे



Sinhagad Times

या कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके, सायली वांजळे, शुक्राचार्य वांजळे, काकासाहेब चव्हाण, त्रिंबकअण्णा मोकाशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.