डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'


Donje Gram Panchayat honored with Sharad Adarsh ​​Krishi Gram Puraskar


सिंहगड टाईम्सच्या व्हाट्स अ‍ॅप ग्रुप ला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा 

 पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने शेती, पाणी, फळबागा, भाजीपाला, शेततळे बायोगॅस, वृक्षरोपण, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती,गाय गोठा अशा सर्व निकषांची चांगल्या प्रकारे व उत्तम नियोजन करून केलेल्यां कामाची पडताळणी करून हवेली तालुक्यातील डोणजे ग्रामपंचायतीला शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे  वितरण काल जिल्हा परिषद भवन पुणे येथे वितरण करण्यात आले होते. 


हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार सोहळा पुणे जिल्हा परिषद पुणे व कृषी विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.  या पुरस्काराचे वितरण शिरुर हवेली चे आमदार अशोकबापू पवार व महिला व बालकल्याण सभापती पूजाताई नवनाथ पारगे यांचे शुभहस्ते करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम एकवीस हजार रुपयाचा चेक देऊन करण्यात आले.

Sinhagad Times

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

जिल्हा परिषद भवन येथे संपन्न झालेल्या या  कार्यक्रमामध्ये शिरुर हवेली चे आमदार  अशोक पवार, महिला व बालकल्याण सभापती पूजाताई नवनाथ पारगे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के सर, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, कृषी अधिकारी व ईतर उपस्थित होते.


हे पण वाचा, 

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.