सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

From-Rajaram-Bridge-to-Fun-Time-on-Sinhagad-Road-There-will-be-a-2-km-long-flyover


पुणे: सिंहगड रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत तब्बल २. १ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात अली आहे. त्यासाठी तब्बल ११८ कोटी ३७ लाख ९३१ रुपये खर्च येणार आहे. या उड्डाणपुलाचे नियोजन करताना आगामी काळातील सिंहगड रोडवरील मेट्रोच्या मार्किंगचाही विचार करण्यात आला आहे. 

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

सिंहगड रोड वरील धायरी, नऱ्हे, खडकवासला, आणि आजूबाजूच्या गावांचा झपाट्याने विकास होत आहे. नांदेड सिटी देखील झपाट्याने वाढत आहे. तसेच नऱ्हे आणि नांदेड गावात इंडस्ट्रियल एरिया पण विस्तारलेला आहे. त्या दृष्टीने या रस्त्यावर वर्दळही तशीच आहे. रोज लाखो वाहने या रस्त्यावर ये करत असतात. या मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडी हि नित्याची बाबा आहे. त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. अनेक दिवसापासून या रस्त्यावर उड्डाणपुलाची मागणी होत होती. 

हे पण वाचा, स्थायी समिती दालनासमोरच पुणे महापालिका प्रशासनास धारेवर धरत शिवसैनिकांचा राडा

राजाराम पुलाकडून सिंहगडकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी साधारण २१२० मीटर असून स्वारगेट कडे येणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी ही १५४० मीटर लांब आहे. भविष्यातील या रस्त्यावरील मेट्रोच्या मार्किंगचा विचार करून आवश्यक ती जागा मोकळी ठेवली आहे. असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. 

हे पण वाचा, मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास

पुणे महापालिकेने या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेत २०१८ - २०१९ या वर्षांमध्ये १० कोटी रुपये मंजूर केलेलं होते. या कामासाठी सल्लागाराचीही नेमणूक केली होती. सल्लागाराने यासाठी चार पर्याय सुचवले होते त्यापैकी राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत तब्बल २. १ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. २०१९-२० या वर्षांमध्ये ३० कोटी रुपयांची तरतूद करून निवेदा प्रक्रिया राबवली. या उड्डाणपुलाच्या कामासाठी १३५ कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद १० जून २०२१ रोजी मंजूर करण्यात आली होती. 


हे पण वाचा, 

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.