"एवढंच नाही तर पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानाही सोडलं नाही" अजितदादांची मिश्किल टिपणी

Inauguration-program-of-Sanjeevan-Udyan-in-Warje-and-Ajit-Pawars-mischievous-remarks


वारजे: आज सकाळी ७ वाजता  पुणे शहरातील वारजे हायवे लागत असलेल्या वन विभाग महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वनविभागाच्या ३५ एकर जागेमध्ये भव्य संजिवन उद्यान भूमिपूजन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री  अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला. "संजीवन उद्यानाचा" उद्यानामुळे पुणे शहराच्या विकासामध्ये आणखी भर पडणार आहे. ज्या भागात आज भूमिपूजन होत आहे, या भागाला डुक्कर खिंड असं म्हटलं जातं. या भागात काही वर्षांपूर्वी रानडुकरांचा वावर जास्त असल्यामुळे असं नाव पडलं आहे, एवढंच नाही तर पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानाही सोडलं नाही अशी मिश्किल टिपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

Sinhagad Times


हे पण वाचा, चक्क! नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा?

नाव ठेवण्याच्या बाबतीत पुणेकरांचा हात कोणीही धरु शकत नाही. ढोल्या मारुती ते उपाशी विठोबा, पुणेकरांनी नावं ठेवताना देवानांही सोडलं नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोपरखळ्या लगावल्या. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुण्यात संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. वारजे परिसरात वन विभागाच्या जागेवर हे उद्यान साकारणार आहे. सकाळी सात वाजता अजितदादा पवार कार्यक्रम स्थळी हजर झाले. अगदी सातच्या कार्यक्रमाला अजितदादा पवार दहा मिनिटे अगोदर उपस्थित राहिले. त्यावरही त्यांनी टोला लगावत ‘जे सुर्यमुखी असतील ते मला शिव्या देत असतील’, असं म्हटलं. तर मला सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यायला आवडतो, असंही दादांनी यावेळी आवर्जून सांगितलं.


Sinhagad Times



हे पण वाचा,  महामहिम..... गड चढले.... पाहणी केली....समाधीचे दर्शन घेतले........झाडे लावली....गोऱ्हे येथे जेवले.....पुण्याकडे रवाना झाले..... आम्हां मावळ्यांना याचा स्वाभिमानपूर्वक अभिमान वाटला.

यावेळी वनराज्यमंत्री दत्तामामा भरणे, शहरअध्यक्ष प्रशांतदादा जगताप, नगरसेविका दीपालीताई धुमाळ, नगरसेवक सचिनभाऊ दोडके, नगरसेवक दिलीपभाऊ बराटे, नगरसेविका सायलीताई वांजळे - शिंदे, खडकवासला अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, त्रिंबकआण्णा मोकाशी, भावनाताई पाटील, पुनमताई मते, युवक शहरअध्यक्ष महेशदादा हांडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.