महामहिम..... गड चढले.... पाहणी केली....समाधीचे दर्शन घेतले........झाडे लावली....गोऱ्हे येथे जेवले.....पुण्याकडे रवाना झाले..... आम्हां मावळ्यांना याचा स्वाभिमानपूर्वक अभिमान वाटला.

Governor-Koshyari's-visit-to-Sinhagad-fort

बातमी लावण्यासाठी संपर्क 94220 51341

खडकवासला: राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांनी आज महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे भूषण असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले सिंहगडास भेट दिली. त्यांनी संपूर्ण गडाची माहिती जाणून घेतली, सदरची माहिती आमचे मित्र इतिहास संशोधक डॉ नंदकुमार मते पाटील यांनी दिली, सोबत खडकवासलाचे आमदार भीमरावआण्णा उपस्थित होते. गडावर राज्यपालांनी झाडे लावली, सोबत वनाधिकारी होते. गडावरील राजाराम महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन ही घेतले.गडावरील लोकमान्य टिळक यांच्या बंगल्याला भेट दिली.तेथील स्थानिक रहिवाश्यांना उत्तराखंड ला येण्याचे निमंत्रण दिले.या सर्व बाबींचा आम्हां मावळ्यांना सार्थ अभिमानच वाटतो. अगदी वयाच्या 80 व्या वर्षी देखील विसीतल्या तरुणाला लाजवेल अशाप्रकारे गड पायी चालले.

Governor Koshyari's visit to Sinhagad
हे पण वाचा, चक्क! नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा?

 इथपर्यंत आम्हांस स्वाभिमानपूर्वक अभिमान वाटतो मात्र पुढे सर्वसामान्य नागरिक व मावळ्यांना त्रास झाला आणि तो असा त्यांचा गाड्यांचा ताफा रस्त्याने जाताना वाहतूक पूर्णपणे अडवण्यात आली होती, तब्बल एक तास डीआयएटी च्या पुढे रस्त्यात अडकून होती, बरोबर एक वाजता राज्यपाल यांचा ताफा गोऱ्हे येथील नवल अकॅडमी च्या शेजारी असलेल्या एका खाजगी रिसॉर्ट/हॉटेल येथे पोहचला, बहुधा त्यांची तेथे जेवणाची सोय केलेली असावी, आणि पोलीसानी पुढे जाण्यास परवानगी दिली आणि नागरिकांनी सुटकेचा दीर्घ श्वास सोडला. तसेच खडकवासला गावात भाजी मंडईत रस्त्यालगत असलेली भाजीची दुकाने बंद होती, का तर सुरक्षेचा प्रश्न ! रस्त्याच्या दुतर्फा काही अंतरावर पोलीस बंदोबस्तासाठी उभे होते. असो, हा प्रोटोकॉल असतो हे आपण समजू शकतो, राज्यपाल महोदयांची सुरक्षा देखील महत्वाची असते. मात्र बऱ्याच वेळा प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली जाते आणि सामान्य जनतेस वेठीस धरले जाते. नाहक वेळ वाया जातो पर्यायाने मनुष्यबळ वाया जाते, आर्थिक फटका बसतो.

Governor Koshyari's visit to Sinhagad


हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'

असो, याठिकाणी महत्वाचे निदर्शनास आणून दयावे वाटते ते म्हणजे अशा कुणी व्ही आय पी व्यक्ती एखाद्या स्थळास भेट देणार असतात किंवा दौरा असतो, त्याठिकाणी ज्या रस्त्याने ते जाणार असतात ते रस्ते चकाचक होतात, मात्र तसे होताना काही दिसले नाही, हा केवळ योगायोग म्हणावा की दुर्भाग्य हे कळत नाही. कारण सिंहगड रोड अंतर्गत नांदेड फाटा ते अगदी वेल्हा ,हा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. आणि जो केला आहे तो देखील निकृष्ट दर्जाचा आहे. याच रस्त्याने राज्यपाल महोदयांचा ताफा गेला असणार. किरकटवाडी येथे तर "रस्त्यात खड्डे नव्हे तर खड्डयात रस्ता" अशी भयानक अवस्था आहे.तसेच काँक्रीट च्या रस्त्याला दुभाजक नाहीत. या रस्त्यावरच "फौजदारी गुन्हा" दाखल करण्याचा इशारा दिला असताना तसेच तसे पत्र कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर ) पुणे यांना देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य सचिव व हवेली पोलीस स्टेशन यांना मेलद्वारे पत्र दिलेले आहे तरी ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी या खराब रस्त्याची डागडुजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न ठेकेदाराने केला मात्र रस्त्यात अद्याप खड्डे हे 'जिवंत'च आहेत.हे खड्डे कधी कुणाचा 'जीव' घेतील याचा मात्र काडीचा भरोसा नाही. घटना घडल्यानंतर यंत्रणेने जागे होऊन उपयोग काय? आम्हा नागरिकांची एकच माफक अपेक्षा आहे की या रस्त्यावरून आम्हास नीट चालता यावे. सध्या जीव मुठीत धरूनच वाहने चालवावी लागतात.

Governor Koshyari's visit to Sinhagad

हे पण वाचा, तब्बल सोळा महिन्यांच्या खंडानंतर सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि अधिकारी एकत्र

असे हे दौरे केवळ 'शो' साठी नसावेत असे वाटते ,त्या निमित्ताने हा खराब रस्ता दुरुस्त केला असता तर आम्ही सुखी झाले असतो .संबंधित यंत्रणेने व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, अधिकारी यांनी याकामी लक्ष घालावे अन्यथा कुठलीही अप्रिय घटना घडली किंवा अनर्थ घडला तर हेच जबाबदार असणार आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.