चक्क! नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा?

Criminal-charges-will-be-filed-on-Nanded-Fata to-Kirkatwadi-road


किरकटवाडी: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यांतर्गत नांदेडफाटा ते किरकटवाडी फाटा या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाली आहे. या पार्शवभूमीवर वारंवार तक्रार व आंदोलने करून देखील संबंधित यंत्रणा व अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याने चक्क या रस्त्यावरच हवेली पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.  

हे पण वाचा, किरकटवाडी फाट्यावर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांची डागडुजी अर्धवटच

या संदर्भात नांदोशी, वांजळवाडी गावाचे राहवाशी मारुती बाप्पुसाहेब गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली असून त्याची एक प्रत राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव आणि हवेली पोलीसला ईमेल द्वारे पाठवण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये मारुती गायकवाड यांनी सदरचा रस्ता त्यांना गेल्या ३० वर्षांपासून त्रास देत असून मानसिक व शारिरीक छळ करत आहे, तसेच या रस्त्यामुळे आत्तापर्यंत त्यांचे मोठयाप्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा रस्ता पूर्णपणे खड्डामय असून नागरिकांच्या जीवितास धोका असून सिमेंटच्या रस्त्याला तर दुभाजकाचं नसून साईडपट्टी तसेच पाणी होऊन जाण्यासाठी गटारे देशील बांधलेली नाहीत. असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित अधिकारी या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने शेवटी रत्याच्याच नावे पोलिसांत तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असा पवित्रा घ्यावा लागला आहे. मात्र या सर्व बाबीस संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत असे गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. 


यावर सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य सचिव आणि हवेली पोलीस प्रशासनाकडून काय ऍक्शन घेतली जाणार हे औसुक्यचे ठरणार आहे. 


Criminal-charges-will-be-filed-on-Nanded-Fata to-Kirkatwadi-road


हे पण वाचा, पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार


विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च २०१८ मध्ये नांदेड फाटा ते वेल्हा या एकूण ३४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची निवड काढली असून या कामासाठी निधी हा 'हायब्रीड ॲन्युईटी' पद्धतीने देण्यात येणार असल्याचे निवेदामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदानुसार नांदेड ते वेल्हा अंतर्गत नांदेड फाटा, किरकटवाडी, खडकवासला ते खानपूर ते पाबेघाटमार्ग वेल्हा असा रस्ता असून नांदेडफाटा ते खानपार पर्यंत १० मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीट रस्त्याचे प्रयोजन आहे. या मध्ये नांदेड ते किरकरवाडी फाटा चारपदरी १६ मीटर म्हणजेच ५४ फुटी काँक्रीट रस्ता आहे. मात्र प्रत्यक्षात निवेदेनुसार काम होत नसल्याच्या या अगोदर अनेक तक्रारी बांधकाम विभागाकडे गेलेल्या आहेत. तसेच इतर ठिकाणी १० मीटर रस्ता व १२ मीटर रुंदीचा पूल असून रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रीटची गटारे करण्यात येतील असा उल्लेख आहे. मात्र प्रत्येक्षात असे काम होताना दिसत नाहीये. हा रास्ता अंदाजे ६५ ते ७० कोटी रुपये एवढ्या रकमेचा असल्याचे समजते. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचा रस्ता आणि उर्वरित खड्डेमय रस्ता यावर कायदेशीर कारवाई करावी लागणे हे आपल्या देशवासीयांची स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ७४ वर्षांनंतरही दुर्भाग्य आहे असे गायकवाड यांनी सिंहगड टाईम्सशी बोलताना सांगितल आहे.   

हे पण वाचा, तब्बल सोळा महिन्यांच्या खंडानंतर सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि अधिकारी एकत्र

मध्यांतरी पाऊस पडल्यानंतर किरकटवाडी फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. काही रस्त्याची पातळी समांतर नसून वर खाली झालेली आहे. रस्ता समांतर ऐवजी एकाच ठिकाणी डांबरीकरणचा ढीग टाकल्याने छोट्या टेकड्या वरुन दुचाकी घेऊन जावे लागत असल्याने गाडी आदळून गाडीचे नुकसान होत आहे. थोडा जरी पाऊस झाली तरी या भागात पाणी साचत आहे. वारंवार तक्रार व आंदोलने करूनही अधिकारी दुर्लक्ष्य करत असल्याने त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 

हे पण वाचा,
 डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी
महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.