अजब कारभार: ट्रॅफिक पोलिसांनी गाडीवर बसलेल्या दुचाकीस्वाराला गाडीसहित उचलून टेम्पोत ठेवले

 

The-traffic-police-picked-up-the-two-wheeler-and-put-it-in-the-tempo

पुणे: शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. परंतु या नियमांची पायमल्ली होताना दिसते. पुण्यात वाहतूक पोलिसांकडून अजब प्रकार पाहावयास मिळाला आहे. वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टेम्पोत भरले, ही घटना नाना पेठेत गुरूवारी पावणे-पाचच्या सुमारास घडली. यावरून भारतात लोकशाही आहे की, तालीबानी कारभार, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. चौका-चौकात ग्रुपने ठिय्ये मारून ये-जा करणार्‍या चाकरमान्या दुचाकी स्वारांना अडवून काही न काही कारणे सांगून अडविणे, त्यांच्याकडून वसुली केली जाते.

हे पण वाचा, चक्क! नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा?

हे प्रकार शहरात सर्रासपणे घडत असताना, गुरूवारी सायंकाळी समर्थ वाहतूक पोलिस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात वाहतूक पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला उचलून टेम्पोत भरले. यावेळी वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसाने करणे, तरी कुठपत योग्य आहे.

हे पण वाचा, तब्बल सोळा महिन्यांच्या खंडानंतर सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि अधिकारी एकत्र

वाहतूक पोलिसांनी वाहने उचलण्याचा वर्षभराचा ठेका एका खाजगी ठेकेदारांना दिला जातो. हा ठेकेदार २५० ते ३०० रुपये रोजीवर वाहतूक विभागाला माणसे पुरवली जातात. परंतु या माणसांची चारित्र्य पडताळणी केली जात नाही. या माणसांना दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक वाहने उचलल्यास ठेकेदाराकडूनत्यांना बक्षीसही दिले जात असल्याची माहिती आहे. हे बक्षीस मिळविण्याच्या उद्देशातून वाहनाची उचलेगिरी करणारी ही माणसे नियमांचेही पालन करीत नाही. उलट दादागिरीवर उतरतात.

हे पण वाचा,

डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी
महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.