घर जळालेल्या कुटुंबांना नाम फाऊंडेशनचा आधार; नव्याने बांधलेली घरे सुपूर्द, राष्ट्रवादीच्या सभापतीचाही मोठा हातभार

The-burnt-houses-at-Bahuli-were-inspected-by-the-Naam-Foundation

खडकवासला: संपूर्ण राज्याला परिचित असलेले नाम फाऊंडेशन आणि मदत हे जणू काही समीकरणच झाले आहे. बहुली-भगतवाडी येथे मार्च २०२१ मध्ये अचानक लागलेल्या आगीतून २२ घरे पूर्णपणे जळून खाक झाली होती. सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुढाकाराने नाम फाउंडेशनच्या माध्यमातून या कुटुंबियांसाठी तात्काळ घरे उभारण्यात आली. तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनातून जि. प. महिला व बालकल्याण समिती सभापती पुजा पारगे यांच्या सभापती फंडातून ११ लाख रुपये या कुटुंबांना देण्यात आले. २३ ऑगस्ट रोजी या घरांचा लोकार्पण सोहळा सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडला. 


हवेली तालुक्यातील बहुली गावाचा भगतवाडी मध्ये मार्च २०२१ लागलेल्या आगीत घरे जळून खाक झाली होती. खडकवासला धरणापासून २० किलोमीटरवर बहुली भगतवाडी गाव आहे. या आगीमध्ये अनेक घरे जाळून खाक झाली होती. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. नाम फाउंडेशनने सामाजिक बांधलेली जपत पीडित कुटुंबांना आधार देत त्यांच्यासाठी बांधलेली नव्याने बांधलेली पक्की घरे सुपूर्द केली. या साठी सर्वच स्तरातून मदत झाली. महिला व बालकल्याण समिती सभापती पुजा पारगे यांच्या सभापती फंडातून त्येक कुटुंबासाठी ५० हजार असे एकूण ११ लाख रुपये या कुटुंबांना देण्यात आले. नगरसेवक सचिन दोडके यांनीही जळीतग्रस्त कुटुबांना मदत केली. सर्व पक्षीय तसेच सर्वच स्तरांतून झालेल्या मदतीने अवघ्या ५ महिन्यामध्येच नविन घरे ऊभी राहू शकली.


आपण मदत कोणाची करत नाही, मदत हा शब्दच घेऊ नका, नाम फौंडेशनची स्थापनाच तळागाळातील लोकांना आधार वाटावा म्हणून झाली आहे.  त्यांची घरे जळली होती ती बांधली. त्यामध्ये मी एकटाच नव्हतो त्यामध्ये सर्वच पक्षातील मंडळी एकत्र येऊन कुणी वाळू दे कुणी सिमेंट, कुणी टाईल्स दिल्या अश्या काळात सगळेच देत असतात. जात धर्म याच्या पलीकडे जाऊन जाऊन विचार करणे गरजेचे आहे. सरते शेवटी ज्यावेळी माणूस म्हणून ज्या वेळी तुम्ही एकमेकांना ओळखलं त्यावेळी सर्व सोपं होईल. सिने अभिनेते नाना पाटेकर, नाम फाऊंडेशन




या वेळी नवनाथदादा पारगे (मा.जिल्हा परिषद,पुणे), रमेशबाप्पु कोंडे (पुणे जिल्हाप्रमुख-शिवसेना), त्र्यंबकआण्णा मोकाशी, नितीन वाघ, मा.बाबुशेट दोडके, युवराज वांजळे, नाम फ़ाऊंडेशनचे पदाधिकारी, बहुला गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचात सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये बहुली गावचे उपसरपंच मा.बंडा भगत यांनी पुढाकार घेवुन संपूर्ण घरे बांधन्याच काम पुर्ण केले. 



हे पण वाचा, 

चक्क! नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा?

 डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.