अखेर ४ दिवसांच्या उपोषणानंतर महानगरपालिकाकेला जाग; राष्ट्रवादीच्या भूपेंद्र मोरेंच्या लढाईला यश

Finally-wake-up-after-4-days-of-fasting-Success-to-NCPs-Bhupendra-Mores-battle


 सिहंगड रोड: गेल्या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारने पुणे ग्रामीणमधील २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. गावातील ग्रामपंचायतीचा अधिकार यामुळे संपुष्टात आल्याने या गावांचा पाणी पुरवठा, कचरा, विद्युत व्यवस्था, आरोग्य यासह रस्त्यांची जबाबदारी महापालिकेकडे आली होती.  गावे महापालिका हद्दीत आल्यानंतर महापालिकेकडून त्वरित पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजे होत्या मात्र नऱ्हे- आंबेगाव परिसरातील मूलभूत समस्या गंभीर बनल्या होत्या. कचऱ्याचे व्यवस्थापन नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. नऱ्हे गावातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध केले  नसल्यामुळे नागरिकांना पालिकेच्या कर भरण्याबरोबर पाण्याच्या टँकरसाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. या साठी राष्ट्रवादीचे पुणे शहर चिटणीस यांनी वारंवार महापालिकेच्या अधिकारण्यांना सांगून तसेच महापालिकेवर आंदोलन करून सुद्धा या समस्या मार्गी लागत नव्हत्या. 

नऱ्हे गावात कचरा उचलण्यासाठी पैशाची मागणी, पैसे न दिल्यास उद्यापासून कचरा उचलला जाणार नाही

या परिसरात स्थानिक नागरिक अजून देखील मूलभूत नागरी सुविधांसाठी झगडत असताना महानगरपालिका प्रशासन अजूनही आपली उदासीनता सोडण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांचे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. तिसऱ्या दिवशी महापालिकेचा अधिकाऱ्यांनी तोंडीच आश्वासन देऊन भूपेंद्र मोरे यांना उपोषण मागे घेण्यास विनंती केली मात्र लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका भूपेंद्र मोरे यांनी घेतली. 

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

अनेकदा पाठपुरावा करून देखील प्रशासन आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत नसल्याने यापूर्वी देखील अनेकदा आंदोलनाच्या, निवेदनाच्या माध्यमातून नऱ्हे, आंबेगाव येथील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या. यावेळी भूपेंद्र मोरे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला परिसरातील स्थानिक नागरिक, सोसायट्या, समाजसेवक, उद्योजक, यांनी आपला पाठिंबा दर्शविला त्यामुळे या परिसरातून मोरे यांच्या उपोषणास प्रतिसाद वाढत होता. 


अखेर चौथ्या दिवशी पुणे महापालिकेने पाणी, ड्रेनेज, रस्ता या मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या असून कचरा समस्येवर देखील तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करता आहे. पथ विभागाने नऱ्हे मुख्य रस्त्याची डागडुजी व अंतर्गत रस्ते तातडीने करण्याचे मान्य केले आहे. यामुळे नऱ्हे मुख्य रस्त्याची झालेली चाळण काही प्रमाणात भरून येण्यास मदत होणार आहेत. नालेसफाई व ड्रेनेज सफाईसाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार असून टेंडरद्वारे सादर कामे करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात दिले. 

रक्तदान शिबिराचे खऱ्या अर्थाने सार्थक, रक्ताची तातडीची गरज असणाऱ्या रुग्णाची मृत्यूच्या दाढेतून सुटका

गेल्या चार दिवसापासून झोपलेल्या प्रशासनाला अखेर जाग आणि राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण संपुष्टात आले. सर्व गोष्टींची पूर्तता प्रशासनाने लिखित स्वरूपात दिल्याने आंदोलन पूर्ण झाल्याची मोरे यांचे बंधू भूषण मोरे यांनी दिली. 

पाण्याची पहिली मागणी तातडीने मान्य 

प्रशासनाने तातडीने दरोडे - जोग येथे असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या टाकीत पाण्याचा टँकर टाकताना उपोषणातील पहिली मागणी मान्य केली. यामुळे प्रशासनातील किमान काही अधिकारी सजग आहेत, असे म्हणता येवू शकेल, असा विश्वास भूषण मोरे यांनी व्यक्त केला.

उपोषण सोडताना राष्ट्रवादी खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे पुणे शहराध्यक्ष रवींद्र पवार, माजी सभापती प्रभावती भूमकर, उपाध्यक्षा राजेश्वरी पाटील, स्वाती पोकळे, शरद दबडे, सुप्रिया भूमकर, भूषण मोरे, सुवर्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

"नऱ्हे गावातील कचरा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा" भूपेंद्र मोरेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.