पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

Pune-Municipal-Corporation-will-fill-the-pits-in-23-years-due-to-new-update


पुणे: पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत समाविष्ट नव्याने झालेल्या २३ गावांमधील पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गावे महापालिका हद्दीत आल्यानंतर महापालिकेकडून त्वरित पायाभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पावसाळ्यामुळे गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, अनेक ठिकाणी कच्चे रस्ते आहेत, तेथे तातडीने डांबरीकरण होणे शक्य नाही. ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, तेथेही नव्याने काम होणार नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

हे पण वाचा, थोपटेवाडी पुलाची उंची वाढवण्यासाठी नगरसेवक ॲड.प्रसन्नदादा जगताप यांचा पाठपुरवठा


पुणे महानगर पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी प्रशासनाने खास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी


नव्याने समाविष्ट झालेल्या या गावातील रस्त्यांची होणार डागडुजी. म्हाळुंगे, सुस, किरकटवाडी, बावधन बुद्रूक, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रूक, नऱ्हे, होळकरवाडी, अवताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळवाडी, नांदोशी, सणसवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी व वाघोली.


हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

 दरम्यान, जून महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारने पुणे ग्रामीणमधील २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. गावातील ग्रामपंचायतीचा अधिकार यामुळे संपुष्टात आल्याने या गावांचा पाणी पुरवठा, कचरा, विद्युत व्यवस्था, आरोग्य यासह रस्त्यांची जबाबदारी महापालिकेकडे आली आहे. या ग्रामपंचायती असल्या तरी मोठ्याप्रमाणात बांधकामे झाल्याने गावांचा विस्तार झाला आहे. 


हे पण वाचा,

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.