नऱ्हे गावात कचरा उचलण्यासाठी पैशाची मागणी, पैसे न दिल्यास उद्यापासून कचरा उचलला जाणार नाही

 

नऱ्हे गावात कचरा उचलण्यासाठी पैशाची मागणी

नऱ्हे: पुणे महापालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अडवणूक केली जात असल्याची तक्रार नऱ्हे येथील नागरिकांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. कचरा उचलण्याचे पैसे न दिल्यास उद्यापासून कचरा उचलला जाणार नाही, अशा धमक्या नऱ्हेतील नागरिकांना दिल्या जात आहेत.या मुळे त्रस्त झालेले नागरिक कचरा मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला टाकला जातो. हायवे वर उघडयावर कचरा टाकला जात आहे. या मुळे परिसराचे सौदर्य तर नष्ट होतंच पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात. 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी


कचरा संदर्भातील पालिकेचे आयुक्त, संबंधित अधिकारी, कचरा ठेकेदार, नागरिक आणि सोसायटी धारक यांची एकत्र बैठक गावामध्ये घेतली जाऊन त्यामधून मार्ग काढला जाऊ शकतो. कचरा ठेकेदाराला पैशाची मागणी करण्याचा कुठलाही अधिकार नाही, जर तुम्हाला स्वईच्छेने पैसे द्यायचे असेल तर देऊ शकता, जर जबरदस्तीने ठेकेदार पैशाची मागणी करत असेल तर मला फोन करा. तुमची अडचण दूर करून देईल. असे अहवाहनही भूपेंद्र मोरे यांनी केले आहे. 


हे पण वाचा, थोपटेवाडी पुलाची उंची वाढवण्यासाठी नगरसेवक ॲड.प्रसन्नदादा जगताप यांचा पाठपुरवठा

नऱ्हे गावामध्ये कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कचरा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन यावर नियोजनात्मक काम झालेले नाही. कचरा उचलण्याचे पैसे न दिल्यास उद्यापासून कचरा उचलला जाणार नाही, अशा धमक्या नऱ्हेतील नागरिकांना दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत.   धमक्या देणारी एजन्सी कागदपत्रे दाखवत नाहीत. काही सोसायट्यांमधून कचरा वाहून नेण्याचे बंद केले असल्याची तक्रार नऱ्हे गावातील ओयासीस, समृद्धी सोसायटी, जी. के. सोसायटी, विलोचन रेसिडेन्सी आदी सोसायट्यांमधील नागरिकांनी आयुक्तांकडे केली आहे. 

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

नऱ्हे गावात ज्या वेळी ग्रामपंचायतीचे अधिकार संपुष्टात येईपर्यंत ह्या कंत्राटदाराकडून कचरा उचलण्यासाठी त्या-त्या सोसायटी-अपार्टमेंटने लोकांची नेमणूक केलेली आहे. विशेष म्हणजे महापालिकेत समावेश होऊन अजून एक महिनाही पूर्ण झालेला नाही. त्यातच या स्वयंघोषित एजन्सीमुळे डबल पैसे देण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. महापालिकेचे प्रॉपर्टी चे टॅक्स वाढवून आले आहेत परंतु कचरा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन यावर नियोजनात्मक काम झालेले नाही. त्यामुळे आम्ही सर्व नागरिक हतबल झालेले आहेत, याबाबत आयुक्तांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी सोसायट्यांच्या वतीने केली आहे.


हे पण वाचा, 

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार


नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.