राष्ट्रवादी काँग्रेसच्या महारक्तदान शिबिरास उदंड नागरिकांचा उदंड प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महारक्तदान शिबिरास उदंड नागरिकांचा उदंड प्रतिसाद

 पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘कोरोना महामारीमुळे परिस्थितीमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास आलेल्या मर्यादा, नागरिकांच्या मनात असलेली भीती, कोरोनासारखी जीवघेणी परिस्थिती या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने घेतलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे.

हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

पुणे राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  'निश्चय गरजवंतांच्या आरोग्यसेवेचा, संकल्प ६२०० प्राणांसाठी महारक्तदानाचा’ हा उपक्रम राबवला होता. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून या रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला असून एकूण १८८३ बॅगांचे रक्तसंकलन झाले. यावेळी उपस्थित राहून राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी  रक्तदात्यांशी संवाद साधला व त्यांनी दाखवलेल्या त्याग भावनेबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आभार व्यक्त केले.

 हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

दरम्यान दत्त्तामामा भरणे यांनी राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाची पाहणी केली. अदयावत आणि सुसज्ज असे कार्यालय उभारल्याबद्दल आनंदही वाक्य केला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे,  माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, विकास दांगट, बाळासाहेब बोडके, बाबुराव चांदेरे यावेळी  उपस्थित होते.

हे पण वाचा, मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास


राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलच्या वतीने डॉक्टरांचे पथक पूरग्रस्त भागात रवाना

निसर्गाच्या प्रकोपाने महाराष्ट्रातील अनेक नागरिकांवर महापुराचे संकट ओढावले आहे. या भागामध्ये पुराचे पाणी साचून रोगराई निर्माण होऊ नये यासाठीसंकटग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीने तातडीची वैद्यकीय मदत रवाना करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे वनराज्यमंत्री मा. ना. दत्तामामा भरणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून ही मदत रायगडाकडे रवाना करण्यात आली आहे. पुरामुळे लाखो बांधव बेघर झाले आहेत. अश्या भागामध्ये पुराचे पाणी साचून रोगराई निर्माण होऊ नये यासाठी तातडीची वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते. अश्या आपत्तीग्रस्त भागात पहिल्या टप्प्यात मुख्यत्वे शारीरिक इजांचे इलाज लवकर करणे आवश्यक असते. या अनुषंगाने राष्ट्रवादी डॉक्टर सेलची टीमयापुढे पुण्यातून दररोज १५ डॉक्टर्स वेगवेगळ्या भागात जाऊन आपल्या पूरग्रस्त बांधवांना वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत. 


हे पण वाचा, 

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.