धायरी: पुणे महानगरपालिका, क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान आणि यशस्विनी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नारायण सणस विद्यालय, धायरी फाटा येथे आज कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. दत्ता कोहिनकर सर यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
हे पण वाचा, पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार: पूर्ववैमनस्यामधून उत्तमनगरमध्ये गाडीचा पाठलाग करत गुंडावर गोळीबार
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या सौ.दिपाली धुमाळ, नगरसेवक श्री.दिलीपभाऊ बराटे, नगरसेवक श्री.दत्ताभाऊ धनकवडे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सौ.मृणाली वाणी, खडकवासला अध्यक्ष श्री.काकासाहेब चव्हाण त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
हे पण वाचा, पिंपरी चिंचवडमध्ये ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडल्याने शहरात एकच खळबळ