चौथ्या मजल्यावरुनखाली पडत अडकलेल्या मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांकडून १५ मिनिटात सुखरूप सुटका

Girl trapped under fourth floor rescued by firefighters in 15 minutes


 पुणे: पुण्यातील शुक्रवार पेठेमधील गणेश अपार्टमेंट येथे चौथ्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रीलमधून खाली पडत अडकलेल्या एका मुलीची सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळी, शिडी व रश्शीच्या साह्याने सुखरुप सुटका करत त्या मुलीला जीवदान देत चोख कामगिरी बजावली. जीवाची पर्वा न करता बचाव कार्य करणाऱ्या जिगरबाज जवानांच कौतुक होत आहे. 

हे पण वाचा, पिंपरी चिंचवडमध्ये ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडल्याने शहरात एकच खळबळ


पुण्यातील शुक्रवार पेठेमधील गणेश अपार्टमेंट येथून अग्निशमन दलाला सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी एक कॉल आला. त्यात एक मुलगी क्रेनला अडकली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ५ मिनिटात अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली. तेव्हा त्यांनी पाहिले की, एक मुलगी चौथ्या मजल्यावर एका खिडकीच्या ग्रीलला पाय देऊन उभे असून तिने साडीला धरुन ठेवले होते. तिचा हात केंव्हाही वाटू शकतो याचा अंदाज घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने खाली जाळीचे नेट धरुन ठेवले. त्यानंतर काही जण वरच्या मजल्यावर जाऊन त्यांनी तेथून रस्सी तिच्याकडे टाकली. तोपर्यंत दुसर्या कर्मचाऱ्यांनी शिडी लावून त्यावरुन जवान तिच्यापर्यंत पोहचले. जवानांनी तिला पकडून खाली आणले. यांनतर अग्निशामक दलाच्या जिगरबाज अग्निशमन जवानांच टाळ्याच्या गजरात अभिनंदन करण्यात आलं. 

हे पण वाचा, पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार: पूर्ववैमनस्यामधून उत्तमनगरमध्ये गाडीचा पाठलाग करत गुंडावर गोळीबार

या थरारक कामगिरीमध्ये अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, जवान राहुल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकुळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे, वाहनचालक राजू शेलार यांनी सहभाग घेतला. या जिगरबाज अग्निशमन जवानांच कौतुक होत आहे. 

हे पण वाचा,

देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.