पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार: पूर्ववैमनस्यामधून उत्तमनगरमध्ये गाडीचा पाठलाग करत गुंडावर गोळीबार

 

In Uttamnagar, a gangster was chased by a vehicle and shot

पुणे: पूर्ववैमनस्यामधून उत्तमनगरमध्ये गाडीचा पाठलाग करत गुंडावर गोळीबार करत पुण्यात मुळशी पॅटर्न थरार घडला. पूर्ववैमनस्यामधून निलेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी पाठालाग करत, दुसर्‍या गुंडाच्या कारवर गोळीबार करुन त्याला जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शिवणे येथील स्मशान भूमी ते एनडीए रोड दरम्यान रविवारी रात्री पावणेदहा वाजता हा थरार रंगला होता. रस्त्याने जाणार्‍या येणार्‍या लोकांना या टोळक्याने पळवून लावून दहशत निर्माण केली. 

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

याप्रकरणी केदार शहाजी भालशंकर (वय- २४) रा. रामनगर, वारजे याच्या पाठीत गोळ्या मारून त्याला तो जखमी करण्यात आले आहे. भालशंकर याच्या फिर्यादीवरुन उत्तमनगर पोलिसांनी निलेश गायकवाड आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार भालशंकर व त्याचे मित्र हर्षवर्धन मोहिते व आकाश शिंदे हे कारमधून रविवारी रात्री पावणेदहा वाजता घरी जात होते. केदार भालशंकर हा गाडी चालवत होता. त्यावेळी शिवणे स्मशान भूमी ते एनडीए रोड दरम्यान निलेश गायकवाड व त्याचे तीन ते चार साथीदार ३ दुचाकीवरुन आले. त्यांनी भालशंकर याच्या गाडीचा पाठलाग करुन त्यांच्यावर फायरिंग केले. त्यांनी एका पाठोपाठ एक अशा ६ गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी कारच्या मागील बाजूच्या काचेतून आरपार शिरुन भालशंकर याच्या पाठीत घुसली. त्यात तो जखमी झाला. शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रोड दरम्यान हा पाठलाग सुरु होता. 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

या घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडवी खुर्द याठिकाणी सरपंदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून येण्यासाठी धमकाविल्याच्या प्रकरणामुळे उत्तमनगर पोलिसांनी जानेवारीमध्ये गुन्हा दाखल करुन, काहीना अटक  करण्यात आली होती़ त्यात केदार भालशंकर हाही एक आरोपीचा समावेश होता.


हे पण वाचा, 

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.