तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभामीवर अण्णासाहेब मगर हॉस्पिटल लवकरच लहान मुलांसाठी सुसज्ज

Annasaheb-Magar-Hospital-will-soon-be-equipped-for-children

हडपसर: हडपसर येथील अण्णासाहेब मगर हॉस्पिटल येथे लवकरच लहान मुलांसाठी सुसज्ज असे केअर सेंटर सुरू होते आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लहान मुलांसाठी केअर सेंटर व ऑक्सिजन प्लांट उभारणी ही कामे जलदगतीने सुरू आहेत. आज हडपसर क्षेत्रीय कार्यालयात हॉस्पिटलच्या कामाचा आमदार चेतन तुपे यांनी आढावा घेतला. 

हे पण वाचा, पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार: पूर्ववैमनस्यामधून उत्तमनगरमध्ये गाडीचा पाठलाग करत गुंडावर गोळीबार

सध्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलचे काम सुरू आहे तिथे पूर्वी गुन्हे शाखेचे कार्यालय होते, तेथील सर्व साहित्य, अनावश्यक सामुग्री काढून दुरुस्ती व डागडुजी करण्यात आली आहे. लवकरच लहान मुलांच्या केअर सेंटरसाठी आवश्यक उपचार यंत्रणाही येथे दाखल होणार आहे. आत्तापर्यंतचे काम वेगाने झाले आहे, उर्वरित कामेही तातडीने पूर्ण होतील याकडे आमदार स्वतः लक्ष देत आहेत. 

हे पण वाचा, पिंपरी चिंचवडमध्ये ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडल्याने शहरात एकच खळबळ

याबाबतची  सर्व कामे, येणाऱ्या अडचणी, यंत्रणांना आवश्यक असलेली मदत याबद्दल बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विद्युत यंत्रणा जोडणी, वातानुकूलित यंत्रणा, नवीन फरशी बसविणे, रंगकाम आदि कामे येथे सुरू आहेत. पुणे मनपाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून याची आमदार तुपे यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी या जागेतील उर्वरित सामान हलविण्याबाबत तसेच जप्त केलेल्या गाड्या या परिसरातून हटविणे आदी मुद्द्यांवर चर्चा केली व सूचना दिल्या. आमदार निधीतून मंजूर झालेला ऑक्सिजन प्लांट नुकताच येथे दाखल झाला आहे लवकरच तो कार्यान्वित होईल. 


हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

यावेळी माजी उपमहापौर निलेश मगर, नगरसेवक योगेशबापू ससाणे, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, डॉ. अंजली साबणे, उप अभियंता विश्राम लहाने, कनिष्ठ अभियंता माधुरी पवार, पोलीस उपायुक्त झोन ५ च्या नम्रता पाटील मॅडम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, डॉ. भेंडे मॅडम, श्री. शेंडे आदि अधिकारी यावेळी उपस्थित होते. 



हे पण वाचा, 

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.