पिंपरी चिंचवडमध्ये ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडल्याने शहरात एकच खळबळ

bomb found in pimpri


पिंपरी: पिंपरी चिंचवडमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. इथे शहरांमध्ये बॉक्स सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना इथं बॉम्ब आढळून आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा, पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार: पूर्ववैमनस्यामधून उत्तमनगरमध्ये गाडीचा पाठलाग करत गुंडावर गोळीबार

दुपारी 10 ते 12 च्या दरम्यान पिंपरी मधील कोहिनूर सोसायटीच्या आवारात खोदकाम सुरू असताना जेसीबी चालकाला हा बॉम्ब आढळून आला. यावेळी उपस्थितांनी तत्काळ सोसायटी मधील चेअरमन यांना ही घटना कळवली. त्यामुळे तात्काळ पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ त्या ठिकाणी आपल्या टीम सोबत पोहचले. तोपर्यंत पुण्याहून बॉम्बनाशक पथक निघाले होते. हे पथक येतातच ज्या ठिकाणी बाँब आढळून आला त्या ठिकाणी पाहणी करत तो बाँब सील करून तपासणी साठी घेऊन गेले आहे. 

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिलीय हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्ब नाशक पथक शोध घेत आहे. बाँब नाशक पथकाने पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या बकेटमध्ये वाळूची पोती टाकून त्यात बॉम्ब सदृश वस्तू ठेऊन पुढील तपासणीसाठी नेण्यात आली आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी उघडकीस येत आहेत.


हे पण वाचा, 

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.