राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या वतीने व मोरया हॉस्पिटलच्या सौजन्याने १६ डॉक्टरांसह वैद्यकीय मदत पूरग्रस्त भागात रवाना

 

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या वतीने व मोरया हॉस्पिटलच्या सौजन्याने १६ डॉक्टरांसह वैद्यकीय मदत पूरग्रस्त भागात रवाना

पुणे: निसर्गाच्या प्रकोपाने महाराष्ट्रातील अनेक नागरिकांवर महापुराचे संकट ओढावले आहे. पुरामुळे लाखो बांधव बेघर झाले आहेत. अश्या भागामध्ये पुराचे पाणी साचून रोगराई निर्माण होऊ नये यासाठी तातडीची वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते. या संकटग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीने व मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सौजन्याने तातडीची वैद्यकीय मदत रवाना करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे वनराज्यमंत्री मा. ना. दत्तामामा भरणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून ही मदत रवाना करण्यात आली आहे. 

हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

Sinhagad Times


पुरामुळे लाखो बांधव बेघर झाले आहेत. अश्या भागामध्ये पुराचे पाणी साचून रोगराई निर्माण होऊ नये यासाठी तातडीची वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे असते. अश्या आपत्तीग्रस्त भागात पहिल्या टप्प्यात मुख्यत्वे शारीरिक इजांचे इलाज लवकर करणे आवश्यक असते. या अनुषंगाने राष्ट्रवादी डॉक्टर सेलची टीमयापुढे पुण्यातून दररोज १५ डॉक्टर्स वेगवेगळ्या भागात जाऊन आपल्या पूरग्रस्त बांधवांना वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत. 

हे पण वाचा, मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास

पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील लोकांना हिवतात, सर्दी, खोकला, पडसे असे आजार उदभवतात त्यावर त्वरित प्रथमोपचार करणे निकडीचे असते. तसेच अनेक प्रकारच्या खोल जखमा, हाडे फ्रॅक्चर होणे, मेंदूला मार लागणे, अवयवांना इजा पोचणे यावर त्वरित उपचार करणे गरजेचे असते. या सर्व अत्यावश्यक आजारांवर राष्ट्रवादी डॉक्टर सेलची टीम उपचार करणार आहे असे डॉ. अजितसिंह पाटील यांनी सांगितले. 
Sinhagad Times

 हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीने तज्ञ डॉक्टरांची टीमही पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आली असून या मधे डॉक्टर अजितसिंह पाटील, डॉक्टर हेमंत तुसे, डॉक्टर सचिन भोंसले, डॉक्टर गणेश तरंगे, डॉक्टर श्रेया चौधेर्री, डॉक्टर सुभम बेंद्रे व टीम आपत्तीग्रस्त महाड भागामध्ये रवाना झाली आहे.  

या वेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या डॉक्टर सेलच्या टीमला निरोप दिला 


हे पण वाचा, 

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.