‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’ बारामतीत निवेदन पाहून अजितदादांचा पारा चढला

 

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’ बारामतीत निवेदन पाहून अजितदादांचा पारा चढला

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य असो, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो किंवा विरोधक, आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त बोलायचं… मग समोरच्याला राग येऊ किंवा लोभ…. याची फिकीर करायची नाही, असा दादांचा सडेतोड आणि परखड  स्वभाव.. असा हा अजितदादांच्या रोषाला बारामतीला निवेदन घरवून येणाऱ्याला सामोरे जावे लागले. 

हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

अजित पवार हे दर शनिवारी रविवारी बारामती मध्ये असतात या वेळी ते आपल्या बारामती मतदार संघातील लोकांच्या अडी-अडचणी जाणून घेत असतात. सकाळी अजितदादांचा निवेदन स्वीकारण्याचा देसाई इस्टेट मध्ये कार्यक्रम होता. त्यावेळी एक बारामतीकर आपली तक्रार घेऊन अजित पवारांना निवेदन देण्यासाठी आला. 

हे पण वाचा, मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास

‘माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावं’, अशा प्रकारचं ते निवेदन होत त्यावर अजित पवार हे चांगलेच भडकले, ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, चांगल्या सवयी लावा, नको ती कामे माझ्याकडे घेऊन येऊ नका. अशा शब्दात त्या व्यक्तीला सुनावले. 

हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

तसेच ‘बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल’, असा सज्जड दम अजितदादांनी यावेळी दिला. ‘चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही’, असं अजितदादा म्हणाले.


हे पण वाचा, 

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.