जिल्हा परिषद गटातून शिवापूर गावात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम

खासदार  सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनातून व पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती पुजाताई

अमेझॉन धमाका सेल ऑफर १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट 


खेड शिवापूर: मांगडेवाडी जिल्हा परिषद गटातून राबविण्यात आलेली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अतिशय वेगवान पद्धतीने कार्यरत आहे.संपूर्ण मांगडेवाडी - डोणजे गटांतर्गत घेण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेतील विविध गावांतील अबाल-वृद्धांना होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात झाली आहे. या लसीकरण मोहिमेतील शिवापूर गावांत लसीकरण मोहीम पार पडली. यात तरुणांसह ज्येष्ठांनीही अभूतपूर्व प्रतिसाद दिला.



खासदार  सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनातून व पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती पुजाताई पारगे यांच्या प्रयत्नांतून व शिवापूर आरोग्यकेंद्र अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आजच्या शिबिराचे पुणे जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन पार पडले, व लसीकरण कार्यक्रमास सुरुवात झाली. या लसीकरण मोहिमेतील आर्वी गावातील लसीकरण मोहीमेचा टप्पा आज पार पडला. यात तरुणांसह ज्येष्ठांनीही अभूतपूर्व प्रतिसाद दिला. 



या प्रसंगी मा.पुणे जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, शिवापूरचे सरपंच मा. सतीश दिघे, सा. कार्यकर्ते नाना धोंडे, मालखेडचे सरपंच राजेंद्र जोरी, शिवापूरचे उपसरपंच अण्णा दिघे, सा.कार्यकर्ते राजेद्रं दिघे, डोणजे मा.उपसरपंच बाळासाहेब पायगुडे, पै.उमेश दिघे, संभाजी वाल्हेकर, सचिन धोंडे, प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकिय अधिकारी डॉ.शिंदे, डॉक्टर्स, नर्स, सिस्टर्स, आशा परिचारिका व शिवापुर ग्रामस्थ उपस्थित होते.

हे पण वाचा,

सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.