पुणे: राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतर कोरोना महामारीमुळे लागलेल्या निर्बंधामुळे मागील सुमारे सोळा महिन्यांपासून पुणे जिल्हा परिषदेची ऑनलाइन होणारी सर्वसाधारण सभा आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे सभागृहात होणार आहे. तब्बल १६ महिन्यांच्या काळानंतर पुणे जिल्हा परिषदेची पहिली ऑफलाइन सर्वसाधारण सभा येत्या २३ ऑगस्टला आयोजित केली आहे.
हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'
त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २४ मार्च २०२० ला अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा होणार होती. परंतु राज्यात याच तारखेपासून पहिले कडक लॉकडाऊन सुरू झाल्याने ही सभा होऊ शकली नव्हती. तेव्हापासून अगदी मे २०२१ मध्ये झालेल्या सभेसह आतापर्यंतच्या सर्व सभा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर हि पहिलीच सर्वसाधारण सभा असणार आहे.
हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी
यामुळे या सभेच्या निमित्ताने सोळा महिन्यांच्या खंडानंतर सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि अधिकारी एकत्र येऊ शकणार आहेत. या सभेत आतापर्यंत कोरोनामुळे प्रलंबित राहिलेल्या विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.
हे पण वाचा,
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई
न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार
नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड
जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच
दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली