देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

 

देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला The-photo-of-Khadakwasala-went-viral-on-social-media-across-the-country

खडकवासला: सोशल मीडियावर काही फोटो अचानक व्हायरल होत असतात हे काही नवे नाही. असाच एक फोटो देशभरात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. घरोघरी गॅस सिलेंडर पोहच करणारी एक वयस्कर व्यक्ती आपल्या सायकलवर वाळलेल्या जळावू लाकडाच्या फांद्या घेऊन चालत चालली आहे असे या फोटो मध्ये दिसत आहे. हा फोटो वेगवेगळ्या सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ती वयस्कर व्यक्ती खडकवासल्यातील असून "थोपटमामा" म्हणून त्यांना ओळखले जाते. 

हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

हा फोटो फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटो वरून नेटकऱ्यांनी मोदीसरकारलाही मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. नेटकऱ्यांनी आप आपल्या आशयाने हा फोटो शेअर केला, या फोटोवर नेटकऱ्यांनी अक्षरशः लाईक आणि कमेंटचा पाऊस पडला. कुणी सरकारला धारेवर धरले तर कुणी गरिबांचे कसे हाल होत आहेत हे सांगण्याचा प्रयन्त केला. 

हे पण वाचा, नांदोशीत बिबट्याने शेतकऱ्याच्या डोळ्यांदेखत शेळीचा फडशा पाडला, परिसरात दहशदीचे वातावरण

या फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे वय ६५ असून त्यांचे नाव मारुती गणपती थोपटे आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातून निवृत्त झाल्यानंतर मागील १५ वर्षांपासून ते खडकवासल्यातील भारत गॅस एजेन्सी मध्ये घरोघरी भारत गॅसचे सिलेंडर पोहचवण्याचे काम करत आहेत. खडकवासला परिसरात ते 'थोपटे मामा' म्हणून परिचित आहेत. शांत, सय्यमी, मनमिळाऊ स्वभावाचे थोपटे मामा प्रामाणिकपणे आपले काम करत असतात. 

हे पण वाचा, पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच

 लहानपणापासून कष्टाची सवय असणाऱ्या थोपटे मामांना सार्वजनिक बांधकाम खात्यातून सेवानिवृत्त झाल्यापासून पेन्शन चालू आहे, किरकटवाडी येथील शिवनगर येथे त्यांची स्वतःची तीन माजली इमारत आहे.  तसेच त्यांची मुलेही शिक्षित आहेत. सर्व काही सुरली आहे. मात्र थोपटे मामांना बंबामध्ये पाणी गरम करण्याची जुनी सवय आहे. त्यासाठी त्यांनी बाभळीची लाकडे आपल्या सोबत घेतली होती. 


हे पण वाचा, 

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.