जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

 

Thousands-of-dead-fish-on-the-banks-of-Jambulwadi-lake जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

जांभूळवाडी: दरी पूलालगत आंबेगाव जांभूळवाडी परिसरातील, जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या मास्यांचा ठार लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या तलावाच्या काठावर साधारण पाच ते सात टन मेलेल्या मास्यांचा खच पडलेला आहे. यामध्ये मास्यांच्या छोट्या पिलापासून मोठे मोठे मासे मेलेले दिसत आहेत तसेच मास्यांची पोटं फुगलेली आढळून येतात. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

हे पण वाचा, मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास

आंबेगाव जांभूळवाडी परिसर झपाट्याने विकसित होत असल्याने तसेच तसेच शनीनगर ते जांभूळवाडी रोड लगतच्या मोठ्या मोठ्या सोसायट्यांच्या सांडपान्याची सोया नसल्याने या सोसायट्यांचे पाणी या तलावात सोडले जाते. महापालिका व पाटबंधारे विभाग यांच्या समन्वय न झाल्याने सांडपाण्याची वाहिनी रखडली असली तरी या सोसायट्यांवर कोणतीही कैवारी केल्याचे पाटबंधारे खात्याकडे नोंद सापडत नाही. मात्र अश्या या कारभारामुळे या तलावातील जलचरांचे अस्तिव धोक्यात येत आहे.  

हे पण वाचा, पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच

या सर्व परिसराचे सांडपाणी या तलावात सोडल्याने पाण्याला हिरवट रंग येऊन पाणी दूषित झाले असले तरी मासेमारांकडून या तलावात मासेमारी चालू आहे.  हे नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक होऊ शकते. शिवाय काही नागरीक तलावातील मृत मासे बाजारात व घरी सुद्धा घेऊन जात आहेत.

हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

 तलावात अतिक्रमणे वाढत असताना पाटबंधारे खाते मात्र कोणतीही तसदी घेतली जात नाहीये. शिवाय आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी परिसर झपाट्याने विकसित होत असल्याने तलाव परिसरात दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे. या पुढे हि परिस्थिती बिकठही होऊ शकते. पाटबंधारे खात्याने वेळीच यामध्ये लक्ष्य घालायला हवे. 


हे पण वाचा, 

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.