महेश पोकळे यांच्या पाठपुराव्याला यश; अपघाताला निमंत्रण देणारे रस्ता दुभाजक हटवले


महेश पोकळे यांच्या पाठपुराव्याला यश; अपघाताला निमंत्रण देणारे रस्ता दुभाजक हटवले

धायरी: धायरी परिसरात काही दिवसांपासून रस्त्यांच्या कामाला वेग आला. मात्र, रस्त्यांवरील दुभाजकांची चाळणी झाली आहे. अनेक ठिकाणी दुभाजक अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. अश्यातच धायरी रोडवर दुभाजकांमुळे दुचाकींचा अपघात झाला होता. महापालिका प्रशासनाने इकडे कमालीचे दुर्लक्ष केले होते.  त्यामुळे महेश पोकळे यांनी हे धोकादायक दुभाजक रस्त्यांमधून काढण्याची मागणी महापालिका प्रशासनाला केली होती. महापालिकेने दाखल घेत हे धोकादायक असे दुभाजक हटवले आहेत. 

हे पण वाचा, नांदोशीत बिबट्याने शेतकऱ्याच्या डोळ्यांदेखत शेळीचा फडशा पाडला, परिसरात दहशदीचे वातावरण



हे पण वाचा, खड्ड्यांमध्ये रंगला "विट्टीदांडू अन् गोटया" चा खेळ, पुणे काँग्रेस कमिटीचे भाजप विरोधात अनोखे आंदोलन


धायरीकरांना ये जा करण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. या रस्त्याला दुसरा पर्यायी रस्ता नाहीये. मागच्या वर्षी हा रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी अतिक्रमणे हटवून त्यांचे ८० टक्के पुनर्वसन केले असूनही या रस्त्याची रुंदी वाढवली जात नाही. या रस्त्यावरती लोखंडी रस्ता दुभाजक बसवले आहेत. बसवलेले लोखंडी रास्ता दुभाजक, रस्त्यांची रुंदी, अन् रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या लेन यांचा कोणताही ताळमेळ बसत नाही. उलट हे लोखंडी रस्ता दुभाजकाचं अपघातांसाठी आमंत्रण ठरत आहेत. असे महेश पोकळे यांनी सांगितले. 


हे पण वाचा, 

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.