नांदोशीत बिबट्याने शेतकऱ्याच्या डोळ्यांदेखत शेळीचा फडशा पाडला, परिसरात दहशदीचे वातावरण

 

A leopard attacks a goat in the eyes of a farmer

किरकटवाडी: नांदोशी गावाच्या हद्दीत वांजळवाडी शेतकरी शेळ्या चारत असताना  बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला करून शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत शेळीचा फाडशा पडला. शेतकऱ्याने आरडाओरडा केल्यानंतर शेळीसह जंगलात पाल काढला. या घटनेमुळे या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. 

हे पण वाचा 'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंट पुन्हा नव्याने उभा

काल २७ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतकरी उल्हास जागडे त्यांच्या ३० ते ४० शेळ्या खंडोबा डोंगरालगत त्यांच्या शेतात चरत होते. त्यावेळी शेतकऱ्याच्या सोमोरच अचानक बिबट्याने त्यांच्या एका शेळीवर हल्ला केला. घाबरलेल्या जागडे यांनी आपल्या शेळीचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत हातातील काठीने बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आजुबाचे शेतकरीहि आरडाओरडा करत मदतीसाठी धावले. मात्र बिबट्याने जबड्यात धरलेली शेळीची मन सोडली नाही. बिबट्या शेळीला घेऊन जंगलात पसार झाला.  या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

 वनविभागाने बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी काही ठोस उपाय योजना करावी. माणसांवर जर बिबट्यांनी हल्ला केला तर याला जबाबदार कोण? मागील वर्षीही बिबट्याने जागडे यांची एक शेळी खाल्ली होती. असे नांदोशीतील शेतकरी उल्हास जागडे यांनी सांगितले.

हे पण वाचा, पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच

याबाबत  नांदोशी-सणसनगर वनपाल वैशाली हडवळे यांनी सांगितले की, शेळी खाल्ली त्या घटनास्थळी जाऊन पंचनामा करणार आहे. जर खाजगी जागेवर बिबट्याने शेळीवर हल्ला केला असेल तर शासकीय नियमानुसार जागडे यांना भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल. तसेच हा परिसरात जंगलाचा भाग असल्याने वन्यप्राण्यांचा वावर आहे.नागरिकांनी काळजी घ्यावी. जणावरे वनविभागाच्या हद्दीत चारण्यासाठी घेऊन जाऊ नये. असे आवाहनही हडवळे यांनी केले. 


हे पण वाचा, 

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.