'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंट पुन्हा नव्याने उभा

 

तोडफोडीनंतर 'आपलं खडकवासला' सेल्फी पॉईंट पुन्हा नव्याने उभा

खडकवासला: खडकवासला ग्रामपंचायतीच्या वतीने खडकवासला धरण परिसरात  'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. ५ जून रोजी सदर सेल्फी पॉईंट चे उद्घाटन झाले होते. त्यानंतर काहींत तासातच या याची तोडफोड झाली होती. यासाठी ग्रामपंचायीने एक ते दीड लाखांचा खर्च केला होता. हा खडकवासला धरण चौपाटीवरील सेल्फी पॉईंट न्हा नव्याने उभारण्यात आला आहे. खडकवासल्याचे सरपंच सौरभ मते यांनी स्वखर्चाने सदर सेल्फी पॉईंट उभा केला आहे.

हे पण वाचा, पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच


हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

 ५ जून रोजी सदर सेल्फी पॉईंट चे उद्घाटन सुरप्रय सुळे यांच्या हस्ते झाले होते. आकर्षक विद्युत रोषणाई केलेला हा सेल्फी पॉईंट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.  मात्र विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवत त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास या सेल्फी पॉईंटची तोडफोड केली होती. त्यानंतर सौरभ मते यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हवेली पोलीसांनी प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत खडकवासला गावातील दोन तरुणांना तोडफोड प्रकरणी अटक देखील केली होती. 

हे पण वाचा, सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

यानंतर खडकवासाला ग्रामपंचायत महानगर पालिकेमध्ये सामाविस्ट झाली आणि ग्रामपंचायतीचे अधिकार देखील संपुष्टात आले. त्यामुळे सरपंच सौरभ मते यांनी स्वखर्चातून या सेल्फी पॉईंटची दुरुस्ती केली आहे. खडकवासला धरण परिसरात १४४ कलम लागू असल्याने आकर्षक विद्युत रोषणाई आणि त्यामागे दिसणारा खडकवासला धरणाचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

हे पण वाचा, 

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.