खड्ड्यांमध्ये रंगला "विट्टीदांडू अन् गोटया" चा खेळ, पुणे काँग्रेस कमिटीचे भाजप विरोधात अनोखे आंदोलन

खड्ड्यांमध्ये रंगला "विट्टीदांडू अन् गोटया" चा खेळ, पुणे काँग्रेस कमिटीचे भाजप विरोधात अनोखे आंदोलन   Unique-agitation-of-Pune-Congress-Committee-against-BJP

पुणे: पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत विटीदांडू आणि गोट्या खेळत काँग्रेसच्या शहर शाखेने महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा निषेध केला. "खड्डे विरोधी आंदोलन" टिळक स्मारक चौक टिळक रस्ता येथे करण्यात आले. प्रतिकात्मक विटीदांडू व गोट्या खेळून भाजपाचा निषेध करण्यात आला. 

हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यावेळी म्हणाले नरेंद्र मोदींनी देशच खड्यात घातला आहे, त्यामुळे येथील भाजपने पुणे खड्यात घातले आहे,तसेच रमेश बागवे शहराध्यक्ष यांनी सांगितले पुणे शहरामध्ये महापालिकेत भाजपची सत्ता झाल्यापासून भ्रष्टाचाराचा उच्चांक झाला आहे. विकास तर बाजूला राहिला फक्त ठेकेदारांची चलती झाली आहे त्यामुळे काँग्रेसच्या काळात शहरात झालेला विकास नष्ट झाला आहे तसेच श्री.रमेश बागवे शहराध्यक्ष यांनी सांगितले पुणे शहरामध्ये महापालिकेत भाजपची सत्ता  झाल्यापासून भ्रष्टाचाराचा उच्चांक झाला आहे. विकास तर बाजूला राहिला फक्त ठेकेदारांची चलती झाली आहे त्यामुळे काँग्रेसच्या काळात शहरात झालेला विकास नष्ट झाला. 

हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

 पुणे शहर यांनी भकास केले ते भाजप वाले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या विकासाचे शिल्पकार म्हणून जाहिरात करतात विसंगत आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रकांत दादा पाटिल यांना मोठा चश्मा भेट देणार आहोत म्हणजे त्यांना पुणे भाजपने किती पुणे भकास केले आहे हे दिसेल अशी टीका संजय बालगुडे यांनीही भाजपवर केली". 

हे पण वाचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महारक्तदान शिबिरास उदंड नागरिकांचा उदंड प्रतिसाद

या वेळी बाळासाहेब शिवरकर अभय छाजेड़ सरचिटणीस म.प्र. कांग्रेस कमिटि, नीता राजपूत बाळासाहेब दाभेकर, प्रकाश पवार, सचिन आडेकर, ऋषिकेश बालगुडे,बबलू कोळी,संदीप आतपळकर ,प्रणव नामेकर तसेच कांग्रेस कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.


हे पण वाचा, 

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.