पुणे शहरातील ॲमेनिटी स्पेसच्या जागेवर पुणेकरांच्या हितासाठी वाहनतळे उभारा - आबा बागूल

Aba Bagul-demand-to-build-a-car-park-on-the-site-of-amenity-space-in-Pune-city

बातमी लावण्यासाठी संपर्क 94220 51341

पुणे: पुणे शहरातील सुमारे २७० जागांवरील सुमारे १२३ एकर क्षेत्र असलेल्या अॅळमिनिटी स्पेस खाजगी वापरासाठी दीर्घ मुदतीच्या काळासाठी भाडयाने देण्याचा भाजपने रचलेला डाव हा पुणेकरांच्या हिताविरूध्द असून या सर्व जागांवर वाहनतळ उभे करून पुणेकरांची पार्किंगची सोय करावी असे आवाहन काँग्रेस पक्षनेते आबा बागूल यांनी केले. 

हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'


यावर आबा बागूल म्हणाले की, भाजप महापालिकेत सत्तेत येण्यापूर्वी पर्यंत सर्व सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी अॅयमिनिटी स्पेस पुणेकरांच्या हितासाठी राखून ठेवल्या होत्या. भाजपने मात्र गेल्या ५ वर्षात कोणताही मोठा विकास प्रकल्प पुणे शहरास दिलेला नसून उलट ॲमेनिटी स्पेस देखील विशिष्ट हित संबंधातील लोकांना देण्याचा घाट घातला आहे. 

हे पण वाचा, "एवढंच नाही तर पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानाही सोडलं नाही" अजितदादांची मिश्किल टिपणी

वास्तविक या अॅीमिनिटी स्पेस पोटी एफ.एस.आय देण्यात आलेला असून आता कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम त्यावरील एफ.एस.आय. वापरला गेल्याने तेथे करता येणार नाही. अशा परिस्थितीत कोणता कायदा व नियमावली अंतर्गत ही ॲमेनिटी स्पेसची जागा देण्याचा निर्णय घेतला जात आहे याचा खुलासा मा.आयुक्त यांनी तातडीने करावा अशी मागणी देखील आबा बागूल यांनी केली. 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

आबा बागूल म्हणाले की, सध्या पुण्याच्या विविध नागरी प्रश्नांपैकी रस्ते वाहतूक व पार्किंग हे जीवघेणे प्रश्न बनले आहेत. रस्त्यावरील अमर्याद पार्किंग वाढत असून रस्ते हे पार्किंगसाठी नाहीत असे उच्च न्यायालयाने देखील फटकारले आहे. अशा वेळी या १८५ ॲमेनिटी स्पेस वाहनतळ म्हणून वापरल्यास तेथे पक्के बांधकाम होणार नाही व पुणेकरांची वाहनतळाची फार मोठी सोय संपूर्ण शहरभर होईल. हे वाहनतळ ३ वर्षाच्या ठेका पध्दतीने दिल्यास त्यातून चांगले उत्पन्न देखील महापालिकेस कायमस्वरूपी मिळेल. सदर अॅहमिनिटी स्पेसेस दिर्घ मुदतीच्या काळासाठी (३० वर्षे ते ९० वर्षे) भाडयाने देणे म्हणजेच विकून जेवढे उत्पन्न मिळणार आहे, त्याहून जास्त उत्पन्न वाहनतळाच्या माध्यमातून वाढेल व कायदयाचे उल्लघंनही होणार नाही.

हे पण वाचा, भाजपच्या वतीने किरकटवाडी येथे विकास आराखड्यावर चर्चासत्रा संपन्न

कोरोना संकट काळात ऑक्सिजनचे महत्व सर्वांच्याच लक्षात आले, असे असताना आबा बागूल म्हणाले की, या ॲमेनिटी स्पेसवर वाहनतळ निर्माण करून तेथे कडुलिंब व पिंपळ झाडे लावली तर फार मोठा फायदा होणार आहे. या सर्व ॲमेनिटी स्पेसवर सुमारे एक लाख कडुलिंब व पिंपळ झाडे लावल्यास हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण संपूर्ण शहरात वाढेल. एक कडुलिंब व पिंपळ या झाडांच्या माध्यमातून २७ पेक्षा जास्त व्यक्तींची ऑक्सिजनची गरज भागवते असे मानले जाते. हे लक्षात घेता ॲमेनिटी स्पेस धनदांडग्यांना न देता तेथे वाहनतळच उभारले जावेत व त्याचे ठेके देवून कायमस्वरूपी  उत्पन्न वाढवावे. या जागेवर कडुलिंब व पिंपळ झाडे ऑक्सिजन वृध्दीसाठी लावावीत यातच पुणेकरांचे हित आहे. 

हे पण वाचा, महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

मूठभरांच्या आर्थिक फायदयासाठी पुणेकरांच्या हिताला तिलांजली देवू नका व बहुमताच्या जोरावर हे धोरण राबवू नका. ॲमेनिटी स्पेसचा वापरलेला एफ.एस.आय मुळे सदर ॲमेनिटी स्पेसची जागा नॉल बिल्डेबल झालेली असून सदर ॲमेनिटी स्पेस बिल्डेबल करण्याचा प्रयत्न चुकीचा असून कायदेशीरित्या होवू न शकणारा प्रकार थांबवा व ॲमेनिटी स्पेस दीर्घ मुदतीच्या काळाने देवू नका. त्याठिकाणी वाहनतळ करा व पुणेकरांचा प्रश्न सोडवा. अन्यथा सदरच्या बेकायेदशीर विषयाचा पाठपुरावा केल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेस गटनेते आबा बागूल यांनी सत्ताधारी यांना दिला. 

हे पण वाचा, चक्क! नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा?

असे निर्णय घेताना पुणे शहरातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, अनुभवी आर्किटेक्ट, तज्ञ मंडळी तसेच पुणे महानगरपालिकेतील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी यांचेशी चर्चा करणे क्रमप्राप्त असताना यांचेशी चर्चा करणे हे सत्ताधारी भाजप व प्रशासनाला का गरजेचे वाटले नाही असा सवाल शेवटी करून आता अंधारात गपचूप जनहित विरोधी धोरणे राबविण्याचा उदयोग भाजपने थांबवावा. पुणेकर सूज्ञ आहेत, ते अशा चुकीच्या पायंडयास कधीच पाठिंबा देणार नाहीत असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.