किरकटवाडी फाट्यावर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांची डागडुजी अर्धवटच

 

Bad condition of road on Kirkatwadi fork, repair of potholes is only partial

किरकटवाडी: किरकटवाडी फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. काही रस्त्याची पातळी समांतर नसून वर खाली झालेली आहे. रस्ता समांतर ऐवजी एकाच ठिकाणी डांबरीकरणचा ढीग टाकल्याने छोट्या टेकड्या वरुन दुचाकी घेऊन जावे लागत असल्याने गाडी आदळून गाडीचे नुकसान होत आहे. थोडा जरी पाऊस झाली तरी या भागात पाणी साचत आहे. १०० मीटर अंतरावर ओढा असूनही रस्त्याचे काम करताना पाणी काढून देण्यासाठी कोणतेही नियोजन झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदारांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. 

हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'

किरकटवाडी फाट्या वरच्या रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करणे आवश्यक असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. ठेकेदाराकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे तात्पुरत्या स्वरूपाचे काम वारंवार होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत लवकरात लवकर या भागातील रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण तरी केले जावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

हे पण वाचा, जिल्हा परिषद गटातून आर्वी गावात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाला सुरवात


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे तीन वर्षांपासून रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. सदर कामासाठी २०२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली असून 'हायब्रीड ॲन्युईटी' पद्धतीने या कामाचा ठेका एका खाजगी कंपनीला देण्यात आलेला आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व विद्यमान आमदार भीमराव तापकीर उपस्थितीत मोठा गाजावाजा करत या रस्त्याच्या कामाची सुरवात झाली उपस्थितीत सिंहगड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

येत्या संप्टेंबर मध्ये या कामाच्या उदघाटनाला तीन वर्ष पूर्ण होतील मात्र कारोना महामारीमुळे लागलेले लॉकडाऊन आणि वनविभागाची परवानगी अशी कारणे देत तब्बल तीन वर्षे होत आली तरी रस्त्याचे काम पूर्ण होत नाहीये. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असूनही खड्डे बुजवण्याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे खड्ड्यात एखाद्याचा बळी गेल्यानंतरच रस्ते चांगले होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

हे पण वाचा,

तब्बल सोळा महिन्यांच्या खंडानंतर सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि अधिकारी एकत्र





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.