पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही चिंताजनक



 पुरंदर:
कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे पहिले प्रकरण पुण्यात आढळले आहे. करोनानंतर आता झिका व्हायरसमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. झिका संसर्गाचाही परिणाम दिसू लागला आहे. पुण्यात संसर्गाचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे अनेक गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अनेक गावांमध्ये हा विषाणू पसरण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.  


हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'

आतापर्यंत या व्हायरसवर ना कोणती लस आली आहे, ना कोणतं औषध उपलब्ध आहे. यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि द्रवरुपी पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो. या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गाव पंचायतीकडून कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. पुढचे किमान चार महिने गावात महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. यामुळे याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचे वाटप करण्यात आले.  

हे पण वाचा, किरकटवाडी फाट्यावर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांची डागडुजी अर्धवटच

झिका व्हायरसचा परिणाम गर्भात असलेल्या मुलावर होतो, ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये मेंदूची अपुरी वाढ झालेल्या बाळांचा जन्म होण्याची शक्यता असते. यास्थितीला मायक्रोसेफली असं म्हणतात. पण हा आजार जीवघेणा नाही. मात्र, तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. बाळांमध्ये मायक्रोसेफॅली हा दुर्मिळ दोष निर्माण होऊ शकतो. या बाळांचं डोकं जन्माच्या वेळी लहान असू शकतं.


हे पण वाचा, 

जिल्हा परिषद गटातून आर्वी गावात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाला सुरवात

तब्बल सोळा महिन्यांच्या खंडानंतर सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि अधिकारी एकत्र



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.