सिंहगड: भगत सिंह कोश्यारी हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहे. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी सोमवारी त्यांनी सकाळी सिंहगडाला भेट दिली. शिवनेरीनंतर त्यांनी सिंहगडाला भेट दिली. वयाच्या 80 व्या वर्षी कोश्यारी यांनी चालत सिंहगड सर केला.यावेळी त्यांनी गडाची पाहणी करत छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरेंना अभिवादन केलं. तसेच काही ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले. सुरवातीला लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामास भेट देवून माहिती जाणून घेतली. त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे यावेळी राज्यपालांनी दर्शन घेतलं. त्यांना डॉ. नंदकिशोर मते यांनी किल्ले सिंहगड व परिसराची माहिती दिली.
हे पण वाचा, चक्क! नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा
"छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्यासारख्या इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल बालकांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.
हे पण वाचा, किरकटवाडी फाट्यावर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांची डागडुजी अर्धवटच
"छत्रपती शिवाजी महाराज आमचे अभिमान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्यासारख्या इतर थोर राष्ट्रपुरुषांबद्दल बालकांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.
हे पण वाचा, पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार
दरम्यान सिंहगडावर राहणार्या नागरिकांनी राज्यपाल येणार्या मार्गावर रांगोळ्या काढून तर एका ठिकाणी काही महिलांनी त्यांची आरती ओवाळून स्वागत केले. त्यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागरिकांची विचारपूस केली तसेच उत्तराखंड मधील गड पहाण्यासाठी आमंत्रणही दिले.
हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'
यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, राज्यपालाचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्यासह सर्व संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
हे पण वाचा,
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी
महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे