हॉटेल व्यावसायिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नवनाथ पारगे यांचा पुढाकार

Navnath Parge's initiative to solve the problems of hoteliers

धायरी: कोरोना आणि लॉकडाऊन हे शब्द आता प्रत्येकास चांगलेच ओळखीचे झाले आहे. जागतिक महामारीच्या या पार्श्वभूमीवर आलेल्या असंख्य अडचणींवर मात करत, माणूस आता कोरोनासोबतही जगण्यास शिकला आहे. पण जगण्यासाठीची सर्वांत आवश्यक बाब असणाऱ्या आर्थिक नियोजनात मात्र हा संघर्ष अजून सुरूच असून, करोना महामारीमुळे लागलेल्या निर्बंधांमुळे  आणि ओढवलेल्या लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती अधिकच भयावह झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. यांचे उदयॊग धंदे पूर्णतः ठप्प झाले आहेत. 

हे पण वाचा, किरकटवाडी फाट्यावर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांची डागडुजी अर्धवटच


याच पार्श्वभूमीवर एकमेकांना समजून - सांभाळून घेत ही बाब मार्गी लावणे गरजेचे असून त्याच अनुषंगाने आज हवेली पोलीस स्टेशन येथे स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार साहेब यांना सिहंगड-पानशेत रोड व सिहंगड पायथ्याचे हॉटेल व्यावसायिक यांना येणाऱ्या अडचणी व समस्यांविषयीचे निवेदन देण्यात आले. 

हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'

पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.नवनाथदादा पारगे यांच्या नेतृत्वखाली हॉटेल व्यवसायिक शशिकांत किवळे, मोनिष कडु, सचिन पारगे, अब्दुल सय्यद, गणेश खिरीड व इतर हॉटेल व्यवसायिक यांचा समवेत शेलार साहेबांना हे निवेदन दिले. यावेळी या समस्यांविषयी सहकार्य करण्याचे आश्वासनही हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिले.

हे पण वाचा, 

जिल्हा परिषद गटातून आर्वी गावात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाला सुरवात

 सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.