जिल्हा परिषद गटातून आर्वी गावात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाला सुरवात

जिल्हा परिषद गटातून आर्वी गावात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात

खेड शिवापूर: मांगडेवाडी जिल्हा परिषद गटातून राबविण्यात आलेली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अतिशय वेगवान पद्धतीने कार्यरत आहे. विविध गावांतील १८ ते ४५ वयोगटातील अबाल-वृद्धांना होणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात झाली. या लसीकरण मोहिमेतील आर्वी गावातील लसीकरण मोहीमेचा टप्पा आज पार पडला.

हे पण वाचा, तब्बल सोळा महिन्यांच्या खंडानंतर सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि अधिकारी एकत्र

ग्रामीण भागातून नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याने लवकरच आपण पूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट गाठू. असे नवनाथ पारगे, पुणे जि प,सदस्य यांनी सांगितले 

हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'



खासदार  सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनातून व पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती पुजाताई पारगे यांच्या प्रयत्नांतून व शिवापूर आरोग्यकेंद्र अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आजच्या शिबिराचे पुणे जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन पार पडले, व लसीकरण कार्यक्रमास सुरुवात झाली. या लसीकरण मोहिमेतील आर्वी गावातील लसीकरण मोहीमेचा टप्पा आज पार पडला. यात तरुणांसह ज्येष्ठांनीही अभूतपूर्व प्रतिसाद दिला. 

हे पण वाचा, पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार: पूर्ववैमनस्यामधून उत्तमनगरमध्ये गाडीचा पाठलाग करत गुंडावर गोळीबार

यावेळी नवनाथदादा पारगे (पुणे जि प,सदस्य), चेतन जाधव (सरपंच,आर्वी), सागर घोगरे (उपसरपंच आर्वी), विष्णु घोगरे, अँड.कुमार घोगरे, विजय नवघणे (मा.सदस्य-ग्रा.प.आर्वी), बाळासाहेब घाटे, प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवापुर वैदकिय अधिकारी डॉ.शिंदे व त्यांचे सहकारी डॉक्टर, नर्स, सिस्टर्स, आशा कार्यकर्ता तसेच आर्वी ग्रामस्त उपस्थित होते.

हे पण वाचा,

सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.