तुकाई नगर, वडगांव बुद्रूकच्या नागरिकांची दैना, गोयल गांगा येथील तुंबलेल्या ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

On the road to the flooded drainage water at Goyal Ganga


सिंहगड रोड: गोयल गांगा येथील शोरबा हॉटेल समोरील रस्त्यावर असलेले ड्रेनेज तुबले आहे. त्यामुळे मेंन होलमधून पाणी उसळून रस्त्यावर वाहत आहे. पादच-यना व वाहन धारकांना अश्याच पाण्यातून जावे लागत असून वाहनचालकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रस्त्यावर घाण साचत असून, वाहनचालक घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनादेखील घाण पाण्यातून वाट काढत चालावे लागत आहे.  हा रस्ता पुढे तुकाई नगर, वडगांव बुद्रूक, या भागा कडे जाणारा मुख्य रस्ता आहे. त्यामूळे हा रस्ता वर्दळीचा असून मोठया प्रमाणात ये-जा असते. 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

या बाबत राष्ट्रवादीचे खडकवासला मतदारसंघाचे शरद दबडे यांनी या ड्रेनेजचे काम त्वरित पूर्ण करावे आशी मागणी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयश्री काटकर मॅडम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

पुणे शहराचा स्मार्ट सिटी समावेश करण्यात आला मात्र अजूनही शहर संपूर्णत: स्मार्ट झालेले नाही. शहरातील अनेक भाग आजही अशे आहेत ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन चोक अप झाल्यामुळे रस्त्यावरून ड्रेनेजचे पाट वाहतात. त्यामुळे संबंधित भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोगराई देखील निर्माण होऊ शकते. मात्र पुणे महानगर पालिकेचे आत्तापर्यंत याकडे दुर्लक्ष झाले होते. पावसाळ्यात निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यात गुंतलेल्या पालिकेला आता कुठे ड्रेनेज लाईनची आठवण झाली तर बर होईल. 


हे पण वाचा, 

 डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'

पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार: पूर्ववैमनस्यामधून उत्तमनगरमध्ये गाडीचा पाठलाग करत गुंडावर गोळीबार

पिंपरी चिंचवडमध्ये ब्रिटिशकालीन बॉम्ब सापडल्याने शहरात एकच खळबळ

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.