दारूच्या नशेत तरुणीचा भर चौकात धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

 

Pune Viral Video, drunk woaman viral viveo in pune

पुणे: पुण्यातील स्वारगेटच्या दिशेने जाणार्‍या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने दारू पिऊन रस्त्यावर झोपून धिंगाणा घालत, गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला. संबधित तरुणीची समजूत काढून रस्त्याच्या बाजूला घेण्यात यश आले. मात्र हा व्हिडिओ पुण्यात तुफान व्हायरल झाला असून यावर एकच चर्चा सुरू झाली आहे.  मद्यधुंद तरुणीने पुण्यात भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गजबजलेल्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने अक्षरशः धिंगाणा घातला. रस्त्यावर झोपून तिने वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अद्याप तरुणीवर गुन्हा दाखल झालेला नाही. ही तरुणी नेमकी कोण आहे, याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने घातलेल्या धिंगाण्याची सर्वत्र चर्चा रंगली.


हे पण वाचा, 

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.