धायरी येथे रायकर मळ्यात होणार १.४० कोटींचा पूल, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश



 धायरी: धायरी गावातील पोकळे वस्तीकडे जाणाऱ्या रायकर मळा येथील नाल्यावर नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्या साठी १.४० कोटी रुपयांच्या खर्चासाठी स्थायी समिती मध्ये मान्यता दिली आहे. रायकर मळा येथील रस्त्याची ९ रुंदी आहे. येथील सद्यस्थितीत पुलाच्या खाली पाईप टाकलेले आहेत. पाऊस पडल्यानंतर हा पुलावरून पाणी वाहते. रायकर मळा येथील वाढती रहदारी मुळे या भागातील लोकांची गैरसोय होत आहे.  दोन वर्षांपूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नागरिकांचा पाण्यात वाहूनही गेले आहेत. 

हे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'

शिवसेनेचे खडकवासला मतदार संघाचे प्रमुख महेश पोकळे यांच्याकडून यासाठी गेल्या तीन वर्षांपासून महानगर पालिकेकडे पाठपुरावा चालू होता. जोरदार पाऊस पडल्यानंतर या पुलावरून पाणी वाहत असते त्यावेळी हा पूल वाहतुकीसाठी बंद करावा लागतो, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे तसेच आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या यांना अडचणींना तोंड द्यावे लागते याचे महत्व आयुक्तांना वेळोवेळी निवेदनाद्वारे पटवून दिले होते. 



हे पण वाचा, पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार: पूर्ववैमनस्यामधून उत्तमनगरमध्ये गाडीचा पाठलाग करत गुंडावर गोळीबार

 रायकर मळा या भागामध्ये अंदाजे २० ते २५ हजार लोकवस्ती आहे. तसेच ती झपाटयाने वाढत आहे.त्यामुळे वाहतुकीवर ताण येत आहे.  या पुलामुळे या भागातील लोकांची येण्याजाण्याची गैरसोर दूर होणार आहे. 

हे पण वाचा,

सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.