स्थायी समिती दालनासमोरच पुणे महापालिका प्रशासनास धारेवर धरत शिवसैनिकांचा राडा

Shiv-Sainiks-holding-a-rally-in-front-of-the-Standing-Committee-Hall


पुणे: गेल्या आठ दिवसापासून विरोधी पक्ष नरगसेवकांच्या प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मध्ये पाणीपुरवठा सुरळीत नाहीये यासाठी काल विशाल धनावडे यांनी महापालिका आयुक्तांना तोंडी निवेदन दिले होते. त्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. त्यामुळे आज आक्रमक पवित्रा घेत आज पेठेतील  पाणीप्रश्नावरून शिवसेना नगरसेवक विशाल धनावडे यांच्या नेतृत्वात पाण्याचे माठ हातात घेऊन हापालिकेच्या स्थायी समिती समोरच राडा घालत घोषणाबाजी केली. या मुळे काही वेळ गोधळाचे वातारण निर्माण झाले.  

हे पण वाचा, महेश पोकळे यांच्या पाठपुराव्याला यश; अपघाताला निमंत्रण देणारे रस्ता दुभाजक हटवले


गेल्या आठ दिवसांपासून वार्डातील पाणीपुरवठा सुरळीत नाही. भापच्या नगरसेवकांच्या वार्डात पाणी येते मात्र आमच्याच वार्डात का येत नाही, तात्काळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुरळीत करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार, असा इशारा नगरसेवक धनावडे यांनी दिला.

हे पण वाचा, खड्ड्यांमध्ये रंगला "विट्टीदांडू अन् गोटया" चा खेळ, पुणे काँग्रेस कमिटीचे भाजप विरोधात अनोखे आंदोलन

गेली आठ दिवस विरोधी पक्ष नरगसेवकांच्या प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. पाण्याच्या टाकीत पाणी आहे. वीज आहे, मात्र पाणी पुरवठा का सुरळीत होत नाही?, असा प्रश्न यावेळी नगसेवक विशाल धनावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. ते म्हणाले, पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने कालच महापालिका आयुक्तांना तोंडी निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. त्यांमुळे आज आम्ही स्थायी समितीच्या दालनात आंदोलन करत आहोत. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही.


हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला


हे पण वाचा, 

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.