थोपटेवाडी पुलाची उंची वाढवण्यासाठी नगरसेवक ॲड.प्रसन्नदादा जगताप यांचा पाठपुरवठा

Follow up of Corporator Adv. Prasannadada Jagtap to increase the height of Thoptewadi bridge


 धनकवडी: पावसाळ्याचे दिवस असल्याने मुसळधार पाऊस पडल्यानंतर खानापूर थोपटेवाडी येथील पूलावरून पाणी वाहू लागते व त्यामुळे खरमरी, खानापूर, कोंडगाव, आंबेड, रांजणे, खामगाव व पाबे मार्गे वेल्हा तालुक्याला जोडणाऱ्या भागातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होते. हा एकमेव मार्ग असून गावकऱ्यांनी अनेकदा सांगूनही या पूलाची उंची वाढवण्यात आलेली नाही. पुलाची उंची वाढवण्यासाठी नगरसेवक ॲड.प्रसन्नदादा जगताप हे पाठपुरवठा करत आहेत. त्या संदर्भात त्यांनी खडकवासल्याचे आमदार भिमराव अण्णा तापकीर यांना लेखी निवेदन दिले. 

हे पण वाचा; सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

दरम्यान, खडकवासल्याचे आमदार भिमराव अण्णा तापकीर यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर साहेब व उप अभियंता वैशाली भुजबळ यांना फोन करून या पूलाची उंची वाढविणे तसेच त्या परिसरातील खानापूर ते थोपटेवाडी हा रोड वनीकरणाच्या अंतर्गत येत असल्याने, वनीकरण खात्याची परवानगी लवकरच घेऊन या ही रोडच्या डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्यानंतर ही दोन्ही कामे तत्परतेने मार्गी लावू असे अधिकाऱ्यांनी आश्वासन भुजबळ यांनी दिले. 

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला


तसेच आमदार भिमराव अण्णा तापकीर यांनी नगरसेवक ॲड.प्रसन्नदादा जगताप यांना याकामाचा पाठपुरावा करून हे काम लवकरात लवकर करून घेण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी सचिन कळंबे, किशोर कुलकर्णी, राहुल जोशी आदी उपस्थित होते.


हे पण वाचा, 

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.