सणासुदीच्या धामधुमीत तंबू मार्केटचे पुनरागमन!

सणासुदीच्या धामधुमीत तंबू मार्केटचे पुनरागमन!   Return of the tambu market during the festive season


पुणे: उद्या आणि परवा श्री गणेश हॉल कर्वे रोड येथे सकाळी १० वाजल्यापासून पुण्यातील सुप्रसिद्ध तंबू मार्केट पुनश्च आपल्या भेटीला येत आहे. हे मार्केट विशेषतः हस्तनिर्मित वस्तूंसाठी ओळखले जाते. सण उत्सवाच्या निमित्ताने या दोन दिवसीय प्रदर्शनातून तुम्हाला सुंदर शोभेच्या वस्तू, हातमागावरचे फॅब्रिक, घरगुती खाद्यपदार्थ, घर व किचन यासाठी  उपयुक्त गोष्टी यांची खरेदी करता येईल, तसेच हस्त निर्मित व्यवसायाला त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन नक्कीच हातभार लावण्याचा प्रयत्न्न असतो. 

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

५ ऑगस्ट गुरुवार-६ ऑगस्ट शुक्रवार रोजी श्री गणेश हॉल, रांका ज्वेलर्सच्या मागे, कर्वे रोड, अश्वमेध हॉल च्या समोर तंबू मार्केट 042 राखी एडिशन चे आयोजन केले असून येथे संसर्ग संदर्भातील जरूरीचे नियम लक्षात घेऊन प्रदर्शनाची मांडणी केलेली आहे. 

हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

  • तंबू मार्केट 042 राखी एडिशन
  • आयोजक : गायत्री चाव्हरेकर
  • स्थळ : श्री गणेश हॉल, रांका ज्वेलर्सच्या मागे, कर्वे रोड, अश्वमेध हॉल च्या समोर
  • तारीख : 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट गुरुवार-शुक्रवार
  • वेळ सकाळी 10 वाजल्यापासून
  • अधिक माहितीसाठी संपर्क : 7020109084/ 7745074288


हे पण वाचा, दारूच्या नशेत तरुणीचा भर चौकात धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न


सुंदर सुबक राख्या, भारतीय हातमागावर तयार होणाऱ्या पश्चिम बंगाल, महाराष्ट्र तसेच राजस्थान, केरळ येथून तयार होणाऱ्या हँड ब्लॉक प्रिंटेड फाब्रिक डिझाईनर साड्या, खण साड्या,  रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, फोटोवरून भरतकाम करून रेखाटलेले व्यक्तिचित्र, भित्तिचित्र, लग्न सण-समारंभाला देण्यासारख्या भेटवस्तू, नाजूक कोरीवकाम केलेले फॅब्रिक आणि ट्रॅडिशनल दागिने अशा अनेक दर्जेदार वस्तूंसाठी अवश्य भेट द्या. आपल्या आवडत्या तंबू मार्केटला! 

हे पण वाचा, 

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.