बाणेर-बालेवाडी भागातील पहिल्या प्रथमोचार आरोग्य केंद्राचे लोकार्पण

Dedication-of-the-first-health-center-in-Baner-Balewadi-area.


बालेवाडी: लहु बालवडकर सोशल वेलफेअर व सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे येथील नागरीकांसाठी अल्प दरात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने  'फर्स्ट एडपाँलि-क्लिनीक, चे उदघाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

भाषणात बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले 'भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एक सामाजिक भान राखून आपल्या परिने होईल तशी नागरीकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी' या आवाहनाला प्रतिसाद देत लहु बालवडकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता निस्वार्थ भावनेने बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे या भागात देखिल भविष्यात असे प्रथमोपचार आरोग्य केंद्र सुरु केले जातील असे आश्वासन दिले. 

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

यावेळेस कोरोनाच्या कठीण काळात सुध्दा जीवाची पर्वा न करता नागरीकांसाठी काम करणारे या भागातील प्राणी मित्र, गँस सिलेंडर कर्मचारी व वृत्तपत्र वितरक यांना कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यानिमित्त लहु बालवडकर सोशल वेलफेअर च्या वतीने व आमदार. चंद्रकांतदादा पाटील प्रदेशाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आला.

हे पण वाचा, थोपटेवाडी पुलाची उंची वाढवण्यासाठी नगरसेवक ॲड.प्रसन्नदादा जगताप यांचा पाठपुरवठा

या प्रसंगी डॉ. सचिन गांधी, सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. रोहित बोरकर, भाजपा नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगसेविका ज्योतीताई कळमकर, भा.ज.यु.मो चे शहर अध्यक्ष राघवेंद्र (बाप्पू) मानकर,  कोथरुड विधानसभा म. संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश बालवडकर, विद्यमान अध्यक्ष पुनित जोशी, कोथरुड भा.ज.पा महिला आघाडीच्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ, प्रभाग क्रमांक ९ च्या महिला अध्यक्षा स्वरुपाताई शिर्के, सुस गावच्या सरपंच अपुर्वाताई निकाळजे, महिला आघाडी च्या तसेच भाजपा चे सर्व पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच  यावेळी उपस्थित होते. 

हे पण वाचा,

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.