अनुसया फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 

Anusaya-Foundation-honors-women-in-various-fields

धायरी: अनुसया फाउंडेशनच्या वतीने सुपर वूमन सत्कार २०२१ हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पुण्याचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, नगरसेवक. सचिनभाऊ दोडके, खडकवासला विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांच्या हस्ते, प्रमुख पाहुण्या तसेच सत्कारमूर्ती मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलेशिया पदक विजेत्या डॉ.प्रचिती पुडे तसेच धायरी येथिल सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या डायरेक्टर डॉ. रश्मी पाटील यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा "सुपर वूमन २०२१" हे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

हे पण वाचा, नऱ्हे गावात कचरा उचलण्यासाठी पैशाची मागणी, पैसे न दिल्यास उद्यापासून कचरा उचलला जाणार नाही

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षा व अनुसया फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्वातीताई पोकळे यांच्या माध्यमातून अनुसया फाउंडेशनच्या वतीने धायरी येथे मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलेशिया च्या मानकरी डॉ. प्रचिती पुंडे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना "सुपर वूमन सत्कार २०२१" पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. २१ व्या शतकातील महिला या पुरुषांच्या बरोबरीने समाजाच्या व देशाच्या उभारणीसाठी योगदान देत आहेत ही आपल्या देशासाठी व समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी



याप्रसंगी युवक शहराध्यक्ष महेशदादा हांडे, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विनायक हनमघर, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे युवक उपाध्यक्ष कुणाल पोकळे, चंद्रशेखर पोकळे, महेंद्र भोसले, प्रतिकभाऊजी पोकळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई दमिष्ठे, चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या माधवी मोरे, खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या कार्याध्यक्षा भाग्यश्री कामठे, सरचिटणीस तृप्ती पोकळे, सुनिता कामठे, मनिषाताई किरदक, रुपाली बांदल, वैशाली थोपटे, वर्षा दमिष्ठे, अबोली सुपेकर, आशा गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.