''कॅरम खेळ हा दुर्लक्षित राहिला असून जागतिक दर्जा मिळावा' ज्येष्ठ खेळाडू सुहास कांबळी

 

Carrom-game-has-been-neglected-and-should-get-world-class-status-Suhas-Kambli

पुणे: पुण्याचे उपनगर असलेल्या येथील ऊन्ड्री बिशप स्कूल जवळ फ्युजन स्पोर्ट्स येथे लवकरच मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमी सुरू होणार असून येत्या १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वा. मान्यवरांच्या हस्ते अकॅडमीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. परिषदेस पाच वेळा राष्ट्रीयपद विजेते, जेष्ठ भारतीय कॅरम संघ प्रशिक्षक सुहास कांबळी(श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कृत),आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रकाश गायकवाड (श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कृत), आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल मुंढे आणि अभिजीत त्रिपणकर, आय सी एफ कप फेडरेशन पॅनल अम्पायर संदीप अडागळे, मास्टर स्ट्रोक कॅरम अकॅडमीचे संचालक गणेश अडागळे आणि उपसंचालिका आशा भोसले उपस्थित होते.

हे पण वाचा, नऱ्हे गावात कचरा उचलण्यासाठी पैशाची मागणी, पैसे न दिल्यास उद्यापासून कचरा उचलला जाणार नाही


कॅरम हा खेळ सर्वपरिचित आहे तसेच हा खेळ घरोघरी असतो या खेळाचा लहान मुलां पासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण आनंद घेतात. परंतु हाच खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक स्वरूपातही  खेळला जातो.या बाबत कुठेच जागरूकता दिसत नाही. कॅरम खेळामध्ये जिल्हास्तरीय ,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त करता येऊ शकतात तसेच आयपीएल सारखी कॅरम ची एक CPLआंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे म्हणून कॅरम या खेळाकडे मनोरंजन किंवा विरंगुळा या दृष्टीने न पाहता एक उत्तम व्यावसायिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळणे गरजेचे असल्याने ही अकॅडमी सुरू करण्यात येत आहे. महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक आणि मुले मुली या अकॅडमीत येऊन खेळू शकतात पण याच बरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून जर या खेळाला स्वीकारायचे असेल तर मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमी मधे ६ ते २१ वयोगटातील मुला मुलींना, महिलांना खास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

कॅरम या खेळा मधे सुद्धा जिल्हास्तरीय, आंतरशालेय, राज्य मानांकन,CPL लीग, झोनल स्पर्धा, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय, स्विस लीग, आय सी एफ कप, आदी प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्या साठी अकॅडमी मधून खेळतानाची आसन स्थिती पासून ते हातात स्ट्रायकर पकडण्या पर्यंत असे आदी मूलभूत तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना इंडियन कॅरम टीमचे कोच ज्येष्ठ खेळाडू सुहास कांबळी म्हणाले की 'कॅरम हा दुर्लक्षित राहिला असून त्याला ऑलम्पिक मध्ये जागतिक दर्जा मिळावा.'

हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

 श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कृत विश्वविजते योगेश परदेशी मुळे कॅरमचा भारतातील चेहरा बदलला आहे. योगेश परदेशी हे पुणे जिल्ह्यातील असून भारता कडून आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅरम खेळा मध्ये जास्तीत जास्त पदके मिळवणारा हा एकमेव खेळाडू आहे. योगेश परदेशी हे कॅरम क्षेत्रातील खेळाडूं मध्ये पुण्याची शान आहे. असे पत्रकार परिषदेत बोलताना अनिल मुंढे यांनी सांगितले.

हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

आयसीएफ कप फेडरेशन पॅनल अंपायर संदीप अडागळे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, ऑल इंडिया कॅरम असोसिएशनचे खजिनदार अरुण केदार हे आमच्यासाठी आमचे आदर्श स्थान आहेत. त्यांनी अनेक माध्यमांद्वारे व सोशल मीडियाद्वारे कॅरम ची प्रचार व प्रसार केला आहे. जगामध्ये अरुण केदार यांनी कॅरमचा इतिहास बदलला आहे. त्यामुळे  भारतातील कॅरमला एक त्यांच्यामुळे एक उंची प्राप्त झाली आहे.

हे पण वाचा, थोपटेवाडी पुलाची उंची वाढवण्यासाठी नगरसेवक ॲड.प्रसन्नदादा जगताप यांचा पाठपुरवठा

आपल्या भाषणात मास्टर स्ट्रोक कॅरम ॲकॅडमी चे संचालक गणेश  अडागळे म्हणाले की, मास्टर स्ट्रोक कॅरम अकॅडमी मध्ये उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार असून सर्व कॅरम रसिकांनी प्रशिक्षणासाठी यामध्ये सहभागी व्हावे. कॅरम हा कायमच दुर्लक्षित राहिलेला खेळ आहे आमच्या अकॅडमी तर्फे कॅरम साठी खास त्यासाठी प्रशिक्षण तयार केले आहे. मास्टर स्ट्रोक कॅरम अकॅडमीच्या संचालिका आशा भोसले म्हणाल्या की पुण्यासारख्या शहरांमध्ये कॅरम या खेळासाठी 8 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांनी व मुलांनी सहभागी व्हावे या क्षेत्रात चांगले करिअर करावे असे आवाहन केले.कॅरम प्रेमींसाठी 3ते 15 ऑगस्ट201 दरम्यान मोफत कॅरम कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे

हे पण वाचा, अनुसया फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान


क्रिकेट सारख्या खेळाला जसा नावलौकिक मिळाला आहे तसा कॅरम हा खेळ अजूनही भारतात दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे कॅरम खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत असा मास्टर स्ट्रोक कॅरम एकेडमी चा उद्देश आहे.

हे पण वाचा,

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.