बावधनमध्ये गटारीसाठी बंगल्यात करून ठेवला गावठी दारुचा बेकायदा साठा; महिलेसह दोघांना अटक

Illegal-stocks-of-gavathi-liquor-seized-in-Bawadhan


 पुणे: बावधन बुद्रुक येथे अवैध गावठी दारूचा साठा करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. बावधन बुद्रुक येथील भुंडे वस्ती परिसरातील बिंदीया राजपुत हिच्याही घरावर पथकाने छापा घातला.  त्यांच्याकडून २ लाख ४१ हजार २५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांच्या डी विभागाने ही कारवाई केली आहे.गावठी दारूच्या सेवनाने जीवितहानी होण्याची शक्‍यता असून, त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

हे पण वाचा, नऱ्हे गावात कचरा उचलण्यासाठी पैशाची मागणी, पैसे न दिल्यास उद्यापासून कचरा उचलला जाणार नाही


विवेक मुकुटसिंग रजपूत (वय ४१, रा. बावधन बुद्रुक), बिंदीया अनिल राजपुत (वय ४६, रा. बावधन बुद्रुक) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. जे. डेरे यांनी फिर्याद दिली आहे.

हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

आषाढी (गटारी) अमावस्याच्या पार्श्वभूमीवर बावधन बुद्रुक गावाच्या हद्दीत फ्लेम कॅम्पस रस्त्यावरील एका बंगल्यात गावठी दारुचा बेकायदेशीरपणे साठा केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. 

हे पण वाचा, थोपटेवाडी पुलाची उंची वाढवण्यासाठी नगरसेवक ॲड.प्रसन्नदादा जगताप यांचा पाठपुरवठा


दरम्यान, घरातून 15 कॅन व अल्टो कारमधून (एमएच १२ एलजे १२७९) ५ कॅन असा एक लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधिक्षक संतोष झगडे, उपअधिक्षक संजय आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय डेरे, राजाराम शेवाळे, उपनिरीक्षक तानाजी शिंदे, गणेश केंद्रे, रोहिदास मासाळकर, समीर पडवळ, दत्तात्रय पिलावरे, शरद भोर, दत्तात्रय आबनावे, निलम पिंगळे, शायीन इनामदार, शामल धुमक यांच्या पथकाने हि कारवाई केली.

हे पण वाचा, 

देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला

पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच

दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.