सिंहगड टाईम्सच्या व्हाट्स अॅप ग्रुप ला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे: पुणे महानगर पालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या ग्रामपंचायतीचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्याठिकाणी महापालिकेकडून कारभार पाहिला जात आहे. दरम्यान कोपरे गावाची जबाबदारी नगरसेवक अॅड. प्रसन्नदादा जगताप यांच्याकडे सोपवण्यात अली आहे. पुणे शहर भाजपच्या वतीने महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये शनिवार दि. ७ आँगस्ट २१ रोजी राबविण्यात आलेल्या जनसंपर्क अभियानांतर्गत आज कोपरे गावामधे तेथील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थांसमावेत बैठक आयोजित करुन गावातील अडीअडचणी समजून घेतल्या.
हे पण वाचा, नऱ्हे गावात कचरा उचलण्यासाठी पैशाची मागणी, पैसे न दिल्यास उद्यापासून कचरा उचलला जाणार नाही
पुणे महानगर पालिकेवर नव्याने समाविष्ट झालेल्या या २३ गावांचा अतिरिक्त भार पडलेला आहे. कोपरे गावातील ग्रामपंचायतीचा अधिकार संपुष्टात आल्याने येथील प्रशासकीय काम महानगर पालिकेकडून केले जात आहे. पुणे महानगर पालिका आणि PMRDA वादामध्ये ग्रामस्थ आणि नागणिकांमध्ये गोधळल्याचे वातावरण निर्माण झाले होते. या बैठकीमुळे ते निवळण्यास मदत झाली आहे. कोपरे गावातील मुख्यत्वे करुन स्वच्छता, रस्त्यावरील अतिक्रमणे, पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त कोठा, आरक्षणे वगैरे संदर्भातील अडीअडचणी, तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. या बैठकीला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात उपस्थित राहीले. तसेच श्री. हेमंतजी रासने, अध्यक्ष, स्थायी समिती पुणे मनपा यांनीही या बैठकीला धावती भेट देऊन मार्गदर्शन केले.
![]() |
कोपरे गावातील अडीअडचणी जाणून घेताना तसेच बैठकीला संबोधित करताना नगरसेवक अॅड. प्रसन्नदादा जगताप |
हे पण वाचा, सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी
सर्व ग्रामस्थांच्या अडचणी, व्यथा समजून घेतल्या व लवकरच यावर योग्य त्या उपाययोजना पुणे महानगरपालिकर्फे करण्यात येईल. तसेच यापुढे काहीही अडचणी वाटल्यास मला अथवा माझे संपर्क कार्यालयात थेट संपर्क करण्याचे आवाहन यावेळी नगरसेवक अॅड. प्रसन्नदादा जगताप यांनी केले.
हे पण वाचा, थोपटेवाडी पुलाची उंची वाढवण्यासाठी नगरसेवक ॲड.प्रसन्नदादा जगताप यांचा पाठपुरवठा
सदर बैठकीला नगरसेविका सौ. वृषाली चौधरी, सौ. मनिषा मोरे उपसरपंच, भगवान मोरे, सुरेश जावळकर, रामचंद्र मोरे, गणेश मोरे, बाळासाहेब चव्हाण, वसंत मानकर, दत्तात्रय मानकर, संतोष मोरे, तानाजी मोरे यांचेसह अनेक मान्यवर ग्रामस्थ तसेच माझे मित्रपरिवारापैकी रवींद्र चौधरी, रमेश दौंडकर, किशोर मुळे, आकाश कडू, राहूल जोशी हे ही उपस्थित होते.
हे पण वाचा,
देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला
पुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार
नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड
जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच
दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली
न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई
इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली